पुन्हा एकदा चेक आऊट करून निघालो. आजही कुणी एक शब्दाने how was your stay? Was everything alright? वगैरे काहीही विचारलं नाही. एकीकडे टॉयलेट मध्ये small टॉक करणारे अमेरिकन भेटले
आणि एकीकडे हे असे व्यवसायाचा भाग म्हणून सुद्धा काही इच्छा नसणारे वाटले.
ठरल्या प्रमाणे बोट राईड साठी गेलो. पुन्हा त्या रिक्षाने खाली गेलो, खाली पोचल्यावर पुन्हा चेक इन करून बोटीची वाट बघत बसलो. बोट निघाली, ठरलेले सेफ्टी measures सांगितले गेले. मला ते सगळं सांगतात तेव्हा हमखास भीती वाटते, काही झालं तर काय अशी शंका मनात येते. पण मग ते बाजूला ठेवून मी पुन्हा वर्तमानात रमते.
आमच्या शेजारी ज्या दोघी जणी बसल्या होत्या त्यांच्या बोलण्यावरून त्या नेदरलँड्स मधल्या असाव्यात असा आम्ही अंदाज लावला. जर्मन आणि डच भाषेत जे साम्य आहे त्यावरून हे वाटलं. मग गाईडने सगळ्यांनाच तुम्ही कुठून आलात विचारलं. बहुतांशी लोक युरोपातले होते, नेदरलँड, पोलंड, हंगेरी असे, एकच जण अमेरिकेतल्या दुसऱ्या राज्यातून आलेले, त्यावर मग हास्यविनोद झाले. जर्मनीतले आम्हीच होतो, भारतीय पण आम्हीच होतो. शेजारच्या बाईंबाबतचा अंदाज बरोबर होता. तिच्याशी बोलणं झालं तेव्हा मग ती जर्मन मधून बोलायला लागली. नेदरलँड्स मधल्या बऱ्याच लोकांना जर्मन भाषा येते, विशेषतः जर्मनीच्या जवळच्या भागातल्यांना. तुम्ही कुठे फिरतात, अजून कुठे जाणार यावर देवाणघेवाण झाली. गाईड जे काही सांगत होता त्याच्या कडे पण लक्ष होतं.
तिथे एक मोठी हाऊस बोट उभी होती, ती काहीशे हजार डॉलर मध्ये रेंट वर घेऊन तुम्ही जाऊ शकता, पलीकडे एक डोंगर आहे तिकडे लोक खास लग्नासाठी येतात अशा काही first world stories ऐकल्या. कोलोरॅडो नदी, या कॅन्यन, इथला इतिहास याबद्दल पण तो बोलत होता. इथे पाण्यात पेट्रोल पंप उर्फ गॅस स्टेशन होते, जे पहिल्यांदा पाहिलं.
बोटीत बसून आम्ही बाहेरचे डोंगर बघत होतो. अनेक लोक kayaking करत होते. अगदी लहान मुलांना घेऊन पण होते. या अश्या साहसी लोकांचं मला फार कौतुक वाटतं. त्या पात्रात या रंगीत kayak आणि त्यांचे लयीत हलणारे हात हे बघायला एकदम छान वाटत होतं. बोट मग एका Canyon मध्ये शिरली, थोड्या वेळाने परत फिरून आलो, राईड संपली. दोन दिवस आधी इथे आलो होतो तेव्हा हे काही नक्की नव्हतं, पण बरं झालं आलो असं तेव्हा वाटलं.



आता पुढे निघायचं होतं Bryce National Park कडे. Page या गावाला बाय केलं. Page will be a happy and beautiful Page in our lives and may be we will come back here again असं त्याक्षणी वाटत होतं.



Bryce National Park कडे जाताना Zion national पार्क पण जवळच आहे. आम्ही ठरवून तिथे जाण्याचा प्लॅन केला नव्हता, कारण तिथे जो निसर्ग आहे त्या पद्धतीचा आम्ही जर्मनीत जवळपास बघितला आहे. तिथे नक्कीच काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या, पण हातातला वेळ बघता आम्ही सरळ Bryce कडे जायचं ठरवलं होतं. या रस्त्यात आता जरा पाण्याचे ओढे दिसायला लागले, एक गाव लागलं तिथे तर दोन झाडं फुलांनी पूर्ण बहरलेली दिसली, दोनच
पण जरा हिरवळ वाढली, काही शेती पण दिसली. आणि खास Bryce ची ओळख असणारे लाल रंगाचे hoodoo (हा शब्दच मला पहिल्यांदा कळला, फोटोत बघून समजेल) दिसायला लागले.







Bryce National Park मध्ये पोचलो आणि रिम पर्यंत गेलो तेव्हा हे काय आहे समोर ते बघून mesmerizing वाटलं. याची माहिती शोधताना जे काही फोटो बघितले होते, त्यावरून माझ्या मनात जर्रा शंका होती, की हे नेमकं कसं असेल? सारखे ते लाल रंग, नॅशनल पार्क याचा कुठे या स्टेज पर्यंत आपल्याला कंटाळा येईल का? पण या सगळ्या शंका खोट्या ठरल्या याचा मला आनंद झाला. ते सगळं बघता क्षणी weirdly beautiful ही माझी पहिली reaction होती. रंग तेच असले तरी फॉर्मेशन वेगळं होतं, अचंबित करणारं होतं. Antelope canyon was more रेखीव whereas here it was all ओबडधोबड, yet it had a common similar structures which in turn was magical. इथे येई पर्यंतच्या रस्त्यात या प्रकारचे फॉर्मेशन दिसले थोडे तरी ते फक्त सिनेमाच्या पोस्टर सारखे होते, आणि हा खराखुरा भव्यदिव्य सिनेमा होता. इथे बरेच हायकिंग रूट पण आहेत, पण माझा जरा पाय दुखत होता आणि आमच्या हातात फार वेळ सुद्धा नव्हता. मग सुमेध आणि सृजन दोघं एका ट्रेल वरून चालत गेले, त्यातला काही भाग बंद होता त्यामुळे त्यांना अजून वेळ लागणार होता, मग ते अर्ध्या अंतरावरुन परत आले.




हे दोघं ट्रेलवर गेले तेव्हा मी बसून होते. दोन अमेरिकन कुटुंब, खरंतर दोन बायका यांच्यातलं संभाषण ऐकत होते. एकतर हे लोक अतीव लाडात येऊन बोलतात, एकीचं सारखं पन्नाशीच्या पुढच्या तिच्या नवऱ्याला बेबी बेबी करत फोटो काढणं सुरू होतं. नवऱ्याला बेबी म्हणणं याचं मला हसूच येतं *haahaa2*, हल्ली बऱ्याच मराठी लोकांचं पण ऐकलं आहे म्हणा हे. ते लोक कुठून आलेत यावर त्यांच्या गप्पा सुरू होत्या. पण जवळच्या बऱ्याच पर्यटनाच्या जागा त्यांना अजिबात माहिती नव्हत्या. मग सुमेध आणि सृजन परत आल्यावर जरा गॉसिप करायला विषय मिळाला 
आता गाडीनेच या पार्क मधल्या अजून काही पॉईंट्स पर्यंत गेलो, पण मुख्य ठिकाणी जेवढं आवडलं तेवढे हे बाकीचे वेगळे वाटले नाहीत. Grand canyon मध्ये सगळेच छान होते, इथे बाकीचे ओकेच होते.
आता इथून निघालो मुक्कामी, दुसऱ्या दिवशी पुन्हा Vegas मध्ये जायचं म्हणून त्या रस्त्यावर असलेल्या Cedar City मध्ये हॉटेल बुक केलं होतं. जाताना Pizza Hut मधून खायला घेऊ असं ठरवलं, तिथे एवढा अंधार दिसला, बाहेरूनच इतकं विचित्र वाटलं की आत जायला नको वाटलं. त्यापेक्षा हॉटेलवर मागवू असं ठरवून हॉटेल वर गेलो. हे हॉटेल फारच बोर होतं, एकच रात्र होती म्हणा इथे, उद्या Vegas कडे परतीचा प्रवास होता.
Pizza मागवून खाल्ला आणि उद्या on the way काय बघता येईल हे शोधत झोपलो. त्याबद्दल पुढच्या भागात...
क्रमशः
मधुरा देशपांडे - शेंबेकर
१६-०५-२५