अमेरिकेचा व्हिसा काढला त्याची एक टर्म (१० वर्ष) उलटून व्हिसा रिन्यूही झाला पण जायचा योग काही आला नव्हता. जाईन तेव्हा पानगळीच्या ऋतूत जाईन म्हणजे भरपूर फोटो काढता येतील असा माझा प्लॅन काही प्रत्यक्षात उतरला नव्हता. पण या वर्षी अचानक काही कारणाने ३ आठवड्यांसाठी जायचा योग आला.
पुण्याहून दिल्लीपर्यंत विमानाने गेलं तर दीड तासाचा प्रवास आहे. ट्रेनने गेलं तर +/- चोवीस तास. दुरांतो एक्सप्रेससारख्या आधुनिक-गतिमान ट्रेन चोवीस तासांच्या आत पोचवतात. पुणे-दिल्ली प्रवासाची आद्य ट्रेन झेलम एक्सप्रेस निवांत पोचते. आम्ही दुरान्तोने जाणार होतो. त्यामुळे सुखाचा, सुरक्षित प्रवास होता. अगदी थोड्या स्टेशनवर थांबत असल्याने आणि पूर्ण ट्रेन फक्त रिझर्वेशनच्या डब्यांची असल्याने अधेमधे चढून त्रास देणारे प्रवासी नव्हते. जेवण मिळत असल्याने डबे न्यायचा व्याप नव्हता.
माझे आजोबा - म्हणजे माझ्या आईचे वडील - निळकंठ यशवंत काळे. त्यांना आम्ही नाना म्हणायचो.
६ सप्टेंबर १९१७ ही त्यांची जन्मतारीख. म्हणजे आज ते असते तर परवा त्यांचा आज १०९ वा वाढदिवस झाला असता.
माझ्या धाकट्या मावशीचा पंचांहत्तराव्या वाढदिवसाचा कार्यक्रम आम्ही योगायोगाने ६ सप्टेंबरला केला. त्यादिवशी सगळे जमल्यावर आज नानांचा वाढदिवस म्हणून त्यांची आणि आजीचीही सगळ्यांना खूप आठवण आली.
तसं पाहिलं तर आमचे नाना हे काही कोणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व नाही - तरीही आज त्यांच्यावर मला लिहावसं वाटलं.
हल्लीच्या हल्ली फारच फोटो टाकणं झालं इथे. हे कळतंय तरी नवीन लेखनाचा बीबी उघडतेय.
नंदिनीच्या बीबीवर लिहिलं मी की आमच्या गच्चीत थोडीफार झाडं आहेत तशी आजूबाजूलाही आहेत त्यामुळे पक्षांचे आवाज वगैरे जरा येत असतात. कॅमेराही जरा वापरता रहावा म्हणून तेच ते पक्षी दिसले तरी कधी कधी कॅमेरा गच्चीत घेऊन जाते मी. गच्चीतल्या झाडांना जरा चांगली फुलं असली की त्यांचेही फोटो काढते. तेही आवडतं मला.
सहा जिवलग मित्र मैत्रिणींबरोबर २०२३ च्या जुलै महिन्यात व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक केला. त्याचं हे तीन वर्षांनंतर लिहिलेलं वर्णन. आता ह्याला ‘देर आए, दुरुस्त आए, म्हणायचं की ‘वरातीमागून घोडं’ ते ठरवता यावं म्हणून नक्की वाचा. आवडलं तर शेअर करा. धन्यवाद.
लहान मुलांना शाळेत सारखेच काही ना काही हस्तकला किंवा चित्रकलेचे प्रोजेक्ट करावे लागतात (जे बऱ्याच वेळा पालकांनाच करावे लागतात!) त्यासाठी हा धागा. इथे आपण केलेले किंवा मदत केलेले, मुलांनी केलेले असे सगळे प्रोजेक्ट्स साधारण साहित्य आणि कृतीसह देऊ, म्हणजे पटापट कल्पना सुचतील आणि हात कामाला लागतील.
21st August 2026
गेले दोन दिवस का कोणास ठाऊक प्राची माझ्यावर रागावली आहे. मी खरं तर काहीच केलं नाही. काल रात्री प्राची तिचं काम करत बसली होती आणि शंतनु मिहिकाला आणायला गेला होता तेव्हा फक्त मी त्यांच्या बेडरूममध्ये शिरून बेडवर 'खोदाखोदी' खेळलो.
भारतात पक्षांच्या साधारणपणे १३०० ते १४०० प्रजाती आढळतात. त्यामुळे ऋतू कोणताही असो, पक्षीनिरिक्षक किंवा ती फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी वर्षभर काही ना काही संधी असतातच. महाराष्ट्रातच नाही तर भारतभर कुठे ना कुठे पक्षीनिरीक्षणाचा योग्य काळ असतोच.
रत्नागिरीच्या घराची हल्ली खूप वेगवेगळ्या कारणांसाठी आठवण येते. आडोने टाकलेले किंगफिशरचे फोटो पाहिले आणि आमच्या घराच्या आजूबाजूला वावरणारे किंगफिशर दिसले. खंड्या हे त्याचे स्थानिक नाव. छोटासा डौलदार पक्षी. बेडरूममधून दिसणार्या माडावर नाहीतर हॉलमधून बाहेर असलेल्या वायरवर बसलेला असायचा. समोरच्या साचलेल्या पाण्यात मासा किंवा किटक दिसला की झूमकम सूर मारून पकडायचा आणि परत मूळ जागी येऊन खात बसायचा. व्हाइट थ्रोटेड तर दिवसाला एकदा दिसायचाच. एकदा तिबोटी पण दिसला.
जीव नकोसा करणारा उन्हाळा संपून मान्सूनची चाहूल लागते. पावसाळा सुरू झाला की निसर्गाचा कॅनव्हासही शुष्क कोरडे रंग बदलून हिरवागार रंग परिधान करतो आणि पक्षीनिरीक्षकांना वेध लागतात ते तिबोटी खंड्याचे म्हणजेच ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशरचे (Oriental Dwarf Kingfisher) किंवा Black-backed Dwarf Kingfisher.
AI (Artificial Intelligence) म्हणजे संगणकाला माणसासारखा विचार, समज, निर्णय किंवा निर्मिती करण्याची क्षमता देण्याचा प्रयत्न. पूर्वी संगणकाला माणसाने प्रत्येक नियम सांगितला की संगणक त्या बरहुकूम काम करत असे
उदा.
ग्राहकाचे वय 18 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म स्वीकारा.
बालवाडी ते दहावी या शैक्षणिक वर्षात माझ्या पाच शाळा झाल्या. पण त्याही आधी मी स्वतःची एक शाळा काढली होती.
मी लहान असताना काही वर्षं आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो. आम्हा भावंडात सगळ्यात मोठी चुलत बहीण विनया, मग माझे दोघं जुळे भाऊ शैलेश-महेश, त्यानंतर माझ्याहून थोडा मोठा माझा चुलत भाऊ अजय आणि सगळ्यात धाकटी मी.
आता आमच्या दोघींचे काय? पण हरून बसेल ती आई कसली. शिलाई तर ती करतच होती तशातच कारखाना सुरू ठेवायचा निर्णय तिने घेतला. कच्चा माल शिल्लक होताच. ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. तरी दादांना ती प्रत्येक गोष्ट विचारून घ्यायची. मला वाटते त्यामुळेच दादा गेल्यानंतर ती कारखाना चालवताना काही डगमगली नव्हती. शिल्लक होता त्या मालापासून तिने परत मिश्री च्या पुड्या तयार केल्या. आणि अण्णाला सांगितले दुकानदारांना पोहोच करायला. पुण्याला पण तिने माल पाठवला. कच्चा माल मागविण्यासाठी ड्राफ्ट वगैरे काढून कसा पाठवायचा ते विचारायला ती घरमालकांच्या आप्पांकडे गेली.
मटकीची डाळ आणली होती आमट्यांचे व्हेरिएशन व्हावे म्हणून.
एका प्रदर्शनात मस्त कांदा लसूण मसाला मिळाला. तो एका सुंदर ऑलिव्स च्या बाटलीत काढून ठेवलाय. त्यामुळे तो ड्रॉवर उघडला की दिसतो आणि सारखा वापर करू वाटतो.
परवा मटकीची डाळ दिसली आणि अचानक झणझणीत सोलापुरी डाळ कांद्याची आठवण झाली.
मग काय केला लगेच.
माझे दादा कुठेही बाहेर निघाले की मला बरोबर घेऊन जात. सगळ्यांना सांगत हे आमचे शेंडेफळ म्हणून. माझ्या इतका त्यांचा सहवास माझ्या कोणत्याच भावंडांना मिळाला नाही. कारण ते जेव्हा लहान होते तेव्हा माझे दादा 1942 च्या लढ्यात उतरले होते. त्यामुळे सतत त्या कामात आणि जेलमध्ये असायचे. मला वाटते दादांची पण मुलांबरोबर राहायची हौस राहिली असेल त्यामुळे ते माझे खूप लाड करत, असे आता मला वाटते. विशेष म्हणजे माझ्या कोणत्याच भावंडांनी त्याबाबत माझा राग राग केला नाही. उलट त्यांनीही माझे लाडच केले. मला वाटते ते सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे असेल.
मी दुसरीत किंवा तिसरीत असेन. तेव्हा आम्हाला शाळेने कराड मधील मुतालिक वाडा आहे तिथे नेले होते. तिथे एक जण आम्हाला मुलांना गोष्ट सांगत होते.,'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'. तर ते गृहस्थ मला खूप आवडले. त्यानंतर ते एक दिवस चाळीतील कुणाकडे तरी आले होते, मी त्यांना कुठे पाहिले हे विसरून गेले होते. मी तिथेच खेळत होते. त्या ग्रस्तांना पाहिल्यावर का कुणास ठाऊक मला वाटले की हे माझ्या दादांचे मित्र आहेत. त्यामुळे मी दोन-तीनदा त्यांना म्हणाले की माझे दादा घरी आहेत. त्यांनाही वाटले कोण हिचा दादा आहे बघूया. मला म्हणाले चल तुझ्या दादांकडे.
युरोप मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहात ९५ टक्के वेळा स्वच्छता असते. स्वित्झर्लंड मध्ये तर सुबक सजवलेली अनेक टॉयलेट्स पाहिली होती. मग इथे आता काय वेगळं असेल? मी फोटो पाहिले नव्हते, फक्त गुगल वर याबद्दल वाचलं होतं.
तिथे पोचल्यावर बाहेरून तसे नेहमी सारखेच वाटले. आत टॉयलेट पेपर, hand wash, गरम पाणी, हात पुसायला कागद हेही होतं. आणि एका भिंतीला पूर्ण काचेची खिडकी होती, ज्यातून पलिकडे वाहणारी नदी दिसत होती. And even before I realized I went back to औरंगाबाद एसटी स्टँड.
माझ्या आईने तिच्या बालपणापासूनच्या आठवणी लिहिल्या आहेत, आणि त्या इथे सगळ्यांसोबत शेअर करायला मला परवानगी दिली आहे. भाग एक टाकला आहे. मैत्रिणींना वाचायला आवडल्या तर पुढचे भाग टाकेन.
उत्तरेकडच्या सगळ्या धाब्यांवर भाज्या पंजाबी, हरयाणवी असो की राजस्थानी, ट्रान्सपोर्टवाले पब्लिक ताव मारून खाते ते सिरकावाले प्याज! कांदे व्हिनिगरमध्ये मुरलेले असल्यामुळे कितीही खाल्ले तरी तोंडाला कच्च्या कांद्यासारखा वास येत नाही म्हणून हे जास्त प्रसिद्ध झाले आहेत. आतापर्यंत सगळ्या रिल्समध्ये साधीच रेसीपी बघितली होती पण सर्च करताना सगळीकडे 'जैसलमेर की रेस्टॉरंट जैसी स्पेशल ' असा टॅग लावलेला दिसला. मग तसेच शोधून करून टाकले बाबा सिरकावाले प्याज!
१९६५ मध्ये सलग दोन वर्षे देशात पडलेल्या भयंकर दुष्काळाने भारतातील जनतेवर उपासमारीची वेळ आणली. अन्नधान्य आयात करुन लोकांचा जीव जगवणे सरकारला भाग पडले.
परत अशी वेळ देशावर येऊ नये म्हणुन हरित क्रांती जन्माला आली. त्याखाली जास्त उत्पन्न देणारी संकरीत बियाणे भारतात झपाट्याने विकसित झाली व प्रसारीत झाली. त्याआधीची प्रचलीत पारंपारिक बियाणे मर्यादित उत्पन्न देत होती.
सत्यमेव जयते ही सिरिज साधारण २०१२ मध्ये प्रसारीत व्हायला सुरवात झाली. त्यात काही भाग शेतीसंबंधी होते. त्यात एक होता महाराष्ट्राच्या काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यातली पाणीटंचाई आणि एक होता पिकांवरील किटकनाशकांमुळे शेतकर्यांमध्ये वाढलेले कर्करोगाचे प्रमाण.
कार्यक्रमाचा निर्माता आमिर खान याची या निमित्ताने शेतीविषयक प्रश्नांशी ओळख झाली.
परवा ६/६ म्हणजे ६ जून हा जागतिक इकेबाना दिवस आहे. म्हणून या दिवसाचं औचित्य साधून इथे हा लेख आणत्ये. माझ्या अंगात अजिबात कलाकुसर नाही. त्यामुळे माझ्या फोटोग्राफीच्या “कौशल्या”कडे दुर्लक्ष करा :) बरेचसे फोटो खूप जुने आहेत.
काही गाणी अशी असतात की ती मनात निवांतपणे घर करून राहतात; पण त्यांचे खरे अर्थ मात्र काळाच्या ओघात, अनुभवांच्या साठ्याने आणि वयाच्या परिपक्वतेने हळूहळू उलगडत जातात. “बरसात की रात” मधली ही कव्वाली त्यातलीच एक.
लहानपणी बाबा जेव्हा हे गाणं लावायचे, तेव्हा मनात फक्त एकच विचार यायचा तो म्हणजे “कायच्या काय मोठ्ठं गाणं आहे!” ते ऐकण्याचाही कंटाळा यायचा. त्या वेळेस त्यातलं गूढ, त्याची खोली किंवा त्याचा आत्मा काहीच स्पर्शून जात नव्हता. मनात उमटणारा एकच शब्द “रटाळ!”
चॅप्टर १ : स्ट्रेन्जर इन माय हाउस
साधारण १९९९-२००० च्या आसपास राम गोपाल वर्मा-उर्मिला मातोंडकर-मनोज वाजपेयी या जबराट कॉकटेलचा अत्यंत स्केअरी थ्रिलर मुव्ही आला होता, ‘कौन’ !
एका रात्री उर्मिलाच्या घरात एक स्ट्रेन्जर घुसतो आणि सुरु होतो एक लपाछपीचा ट्विस्टस ने भरलेला थरार.. नक्की कोण कोणाला थ्रेट आहे, कोण कोणाला घाबरतय..प्रेक्षक पार कनफ्युज होतात !
तसाच काहीसा थरार गेल्या शुक्रवारी आम्ही अनुभवला !
२२ मे २०२६
मेमोरिअल डे लाँग विकेन्ड असल्यामुळे शुक्रवार दुपार पासूनच सगळीकडे सुट्टीचं वातावरण होतं !
कालपासून फोटो टाकू की नको, टाकू की नको विचार करत होते. शेवटी मोह काही आवरेना, म्हटलं टाकावेच.
सध्या मुंबईचं अगदी जयपूर झालं आहे म्हणजे काय तर गुलाबी झाली आहे. गुलाबी थंडी वगैरे वाटेल कोणाला पण तसं अजिबात नाही. यंदा अगदी उशिराने मुंबईत छोट्या रोहित पक्षांचं (Lesser Flamingo) आगमन झालंय. त्यांच्या दर्शनासाठी सगळे हौशे-नवशे—गवश्यांची गर्दी झाली आहे.
पुण्यात सध्या ऊन 'मी' म्हणत नाहीये तर हॉ हॉ हॉ असे भयानक राक्षसी हसत 'आम्ही' म्हणतंय! अक्षरशः होरपळून घरी आल्यावर गॅसजवळ काही करण्याची किंवा पोळी भाजी खाण्याचीही इच्छा होत नव्हती तेव्हा ही व्हायरल रेसिपी आठवली. केली आणि चक्क आवडली! थोडंच साहित्य असल्याने अगदी पटकन होते.
साहित्यः
दही - २ वाट्या (आमटीची वाटी)
उकडलेले बटाटे - मोठे दोन
कांदा - मोठा १
कोथिंबीर - मुठभर चिरलेली
एकेक टी स्पूनः लाल मिरची पूड, जिरेपूड, आमचूर पावडर,
मीठ चवीनुसार