शाश्वत विकास म्हणजे काय?

गेले काही महिने एका गटाबरोबर पर्यावरण विषयाचा अभ्यास करते आहे त्यातून तयार झालेले काही विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही गोष्टी तुमच्या माहितीच्या असतील आणि काही नवीन असतील पण साकल्याने विचार केला तर आपल्यातल्या प्रत्येकाला यातून एक विचारांची नवीन दिशा सापडेल अशी मला आशा वाटते.

मी तीन छोट्या लेखात किंवा भागात हे विचार मांडणार आहे. काही विधानांसाठी माझ्याकडे लगेच तिला उपलब्ध नाहीये त्यामुळे याकडे लक्ष न देता त्यामागील विचाराकडे संदेशाकडे लक्ष द्यावे असे मी आत्ता पुरते म्हणेन. म्हणजे विदा उपलब्ध नाही असे नाही मात्र माझ्याकडे संदर्भ या क्षणी उपलब्ध नाही हे एवढेच कारण आहे. पुढेमागे मी लेखात त्यांची भर घालीन.

पहिल्या भागात दोन सर्वाधिक परिणाम करणारे प्रश्न आणि त्यांचे थोडक्यात स्वरूप.

दुसऱ्या भागात शाश्वत विकासाचं प्रारूप कसं असावं (आपल्याला काय मुक्काम गाठायचा आहे)?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणाऱ्या काही चांगल्या बातम्या पाहिल्या तर त्यात पर्यावरणाविषयीच्या बातम्या दिसतात. या जागतिक साथीनंतर भविष्यातले जग बदलेल असे बऱ्याच जणांना वाटते, मात्र पर्यावरणाचा विचार करताना ते बदल कसे असले तर हे आलेले संकट आपल्याला योग्य मार्गावर नेणारे ठरेल याबद्दल मला काही विचार मांडायचे आहेत.

तिसऱ्या भागात आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतील जेणेकरून आपण अधिक शाश्वत मार्गाने जीवन जगू शकू. यात मी Do’s and Don’ts ची यादी देण्याच्या ऐवजी काही प्रश्न सांगणार आहे. तुम्ही हे प्रश्न विचारलेत की तुम्हाला सगळ्यात चांगला पर्याय कोणता ते लक्षात येईल. अर्थात आपल्याला हे लक्षात येईलच की सर्वोत्तम पर्याय वापरणे सर्व वेळेस शक्य नसते. अशावेळी कमीत कमी हानी घडवणारा पर्याय वापरता येईल. It will be a trade-off but it will make you aware of the limitations of the option you choose.

Keywords: 

चर्चाविषय: 

शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग १

गेले काही महिने एका गटाबरोबर पर्यावरण विषयाचा अभ्यास करते आहे त्यातून तयार झालेले काही विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही गोष्टी तुमच्या माहितीच्या असतील आणि काही नवीन असतील पण साकल्याने विचार केला तर आपल्यातल्या प्रत्येकाला यातून एक विचारांची नवीन दिशा सापडेल अशी मला आशा वाटते.

मी तीन छोट्या लेखात किंवा भागात हे विचार मांडणार आहे. काही विधानांसाठी माझ्याकडे लगेच तिला उपलब्ध नाहीये त्यामुळे याकडे लक्ष न देता त्यामागील विचाराकडे संदेशाकडे लक्ष द्यावे असे मी आत्ता पुरते म्हणेन. म्हणजे विदा उपलब्ध नाही असे नाही मात्र माझ्याकडे संदर्भ या क्षणी उपलब्ध नाही हे एवढेच कारण आहे. पुढेमागे मी लेखात त्यांची भर घालीन.

पहिल्या भागात दोन सर्वाधिक परिणाम करणारे प्रश्न आणि त्यांचे थोडक्यात स्वरूप.

दुसऱ्या भागात शाश्वत विकासाचं प्रारूप कसं असावं (आपल्याला काय मुक्काम गाठायचा आहे)?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणाऱ्या काही चांगल्या बातम्या पाहिल्या तर त्यात पर्यावरणाविषयीच्या बातम्या दिसतात. या जागतिक साथीनंतर भविष्यातले जग बदलेल असे बऱ्याच जणांना वाटते, मात्र पर्यावरणाचा विचार करताना ते बदल कसे असले तर हे आलेले संकट आपल्याला योग्य मार्गावर नेणारे ठरेल याबद्दल मला काही विचार मांडायचे आहेत.

तिसऱ्या भागात आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतील जेणेकरून आपण अधिक शाश्वत मार्गाने जीवन जगू शकू. यात मी Do’s and Don’ts ची यादी देण्याच्या ऐवजी काही प्रश्न सांगणार आहे. तुम्ही हे प्रश्न विचारलेत की तुम्हाला सगळ्यात चांगला पर्याय कोणता ते लक्षात येईल. अर्थात आपल्याला हे लक्षात येईलच की सर्वोत्तम पर्याय वापरणे सर्व वेळेस शक्य नसते. अशावेळी कमीत कमी हानी घडवणारा पर्याय वापरता येईल. It will be a trade-off but it will make you aware of the limitations of the option you choose.

भाग 1 पृथ्वीची सद्यस्थिती

ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फार भयावह आहे. एका भांड्यातील पाण्याचे तपमान अत्यंत कमी गतीने वाढत असेल तर त्या भांड्यातील पाण्यात बसलेल्या बेडकाला त्याची जाणीव होण्यास खूप वेळ लागतो आणि अशी स्थिती येते की ते पाणी उकळू लागते आणि बेडूक वेळेत बाहेर न पडल्यामुळे मरण पावतो. आपण सध्या हळूहळू तापणाऱ्या भांड्यातल्या पाण्यातला बेडूक आहोत आणि लवकरच हालचाल केली नाही तर आपण बाहेर पडू शकणार नाही.

Frog.png

नक्की प्रॉब्लेम काय आहे? प्रदूषण, तपमानवाढ, अविघटनशील कचरा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात पण हा प्रश्न हिमनगासारखा आहे. आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी या त्या हिमनगाचे एक टोक! खोलात जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न दोन पातळ्यांवरचा आहे.
एक म्हणजे उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांची होणारी हानी (crossing of planetary boundaries) आणि दुसरा पैलू म्हणजे ऊर्जेची वाढलेली आवश्यकता (increasing energy needs).

१. पृथ्वीच्या क्षमतांवर येणारा ताण आणि निसर्गाच्या चक्रामध्ये झालेले फेरफार:

पृथ्वीवर बाहेरून फक्त सौरऊर्जा येते. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या ग्रहावर रिसायकल होत असतात. माणसाने या सर्व चक्रांमध्ये ढवळाढवळ सुरू केली आहे याचा परिणाम जैवविविधता नष्ट होणे, प्रदूषण अशा गोष्टींमधून दिसून येतो.
जसं आपलं घर खर्चाचं एक बजेट असतं की महिन्याला अमुक रुपये खर्चाला आहेत वर्षाला अमुक रुपये आहे आणि याउपर खर्च आला तर मात्र कर्ज काढावे लागेल. त्याचप्रमाणे निसर्गाच्या प्रत्येक स्रोताची झालेली झीज भरून काढण्याची एक क्षमता असते. ती झीज भरून निघायला काही काळ लागतो. निसर्गाची चक्र पूर्ण व्हावी लागतात. त्याचा विचार करून पृथ्वीच्या खर्चाचे बजेट असतं - म्हणजे एका वर्षात आपल्या मानवजातीने किती रिसोर्सेस वापरले पाहिजेत असं. तर मी तुम्हाला पृथ्वीच्या खर्चाचं गणित सांगते. मग तुम्हीच ठरवा आपण किती खर्च करतो आहोत.
आपण आपलं 2019 सालचं बजेट जुलैमध्येच वापरून संपवलं. 29 जुलै 2019 हा हा आपला ओव्हर शूट डे होता आणि त्याच्या पुढचे पाच महिने जगाने जो खर्च केला तो आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी असलेले नैसर्गिक स्रोत वापरून केला. याचा अर्थ असा की आपली मौजमजा आहे आपल्या नातवंडांच्या पतवंडाच्या तोंडचे अन्न पाणी काढून घेऊन चालली आहे. खऱ्या आयुष्यात कोणतेही सुज्ञ माणूस हे असे बजेट काढून जगणार नाही.

निसर्गचक्र कशी चालतात?

निसर्गा कडे पाहिलं तर लक्षात येईल येईल की सगळ्या गोष्टी चक्राकार पद्धतीने चालतात म्हणजे पाण्याची वाफ होते वाफेचे ढग होतात आणि ढगांमधून पाऊस पडतो आणि पुन्हा पाणी जल स्वरूपातील येतं हे जलचक्र झालं तसंच प्रत्येक नैसर्गिक गोष्टीचा आहे. कार्बन ऑक्सिजन किंवा सल्फर आणि बरीच खनिज ती नव्याने तयार होत नाही तिच्या स्वरूपात असतात त्यांचे फक्त स्वरूप बदलते.

सूर्याची ऊर्जा वापरून झाडे कार्बन डाय ऑक्साईडचं रूपांतर साखरेत करतात. ही झाडे प्राणी खातात आणि ऊर्जा वापरताना कर्ब वायू उत्सर्जित करतात. ही साधीसोपी कार्बन सायकल झाली. प्राणी भुकेपेक्षा अधिक खात नाहीत आणि बहुतेक प्राणी अथवा झाडे अनावश्यक साठवणूक देखील करत नाहीत. यामुळे निसर्गाचे चक्र चालू राहते.

कार्बन फार महत्त्वाचा आहे कारण पृथ्वीवरील जीवन हे कार्बन वर आधारित आहे म्हणजे आपले शरीर हे बहुतांश कार्बन ने बनलेले आहे या कार्बनचे चक्र बिघडणे म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका निर्माण होणे. आता हा धोका का निर्माण होतो? जेव्हा आपण खनिज तेलाचा वापर करतो तेव्हा हा कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो. पण हा कार्बन डाय-ऑक्साइड कुठेच रिसायकल होऊ शकत नाही. पृथ्वीच्या कार्बन डाय ऑक्साईड रिसायकल करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे आपण कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करतो आहोत. लाखो वर्षापूर्वी जीवाश्म जमिनीच्या आत गाडले गेले ते जाळून आज आपण पण ऊर्जा मिळवतो आहोत पण त्यातून निर्माण झालेला कार्बन हा जमिनीत परत कसा जाईल याविषयी आपल्याकडे कोणतीही योजना नाही. माणसाच्या एकूण हालचालीमुळे इतर जीवसृष्टी देखील धोक्यात आली आहे आणि जीवसृष्टी जगणे जगणं हे माणसाच्या जगण्या इतकेच महत्त्वाचे आहे कारण जीवसृष्टी जगली नाही तर माणूस जगणार नाही.

या नैसर्गिक चक्राच्या विरुद्ध आपली सर्व जीवनशैली आहे. आपली अर्थव्यवस्था चक्राकार नाही. आपण सतत अधिकाचा (surplus) विचार करतो. अधिक उत्पादन अधिक विक्री अधिक नफा त्यातून अधिक उत्पादन. यात कोठे चक्राकार गती नाही.परंतु अनिर्बंध आणि सतत वाढ ही निसर्गाच्या विरुद्ध आहे. ही वाढ आपण सध्या नैसर्गिक स्रोत वापरून करतो आहोत पण या स्रोतांना मर्यादा आहेत (planetary boundaries) आणि आता त्या उघड होऊ लागल्या आहेत.

या अमर्यादित वाढीचे अजून एक कारण असे की आपल्याला या गोष्टी हे सर्व संसाधने फुकट वापरायला मिळतात. हवा, पाणी, धातू, जमीन या साऱ्या गोष्टी वापरण्याचे आपण निसर्गाला पैसे देत नाही. आपण पैसे देतो ते फक्त मनुष्यबळाचे, सरकारला कर वगैरे देतो. पण झाडाला, हवेला या कराच्या पैशांचा काय उपयोग? निसर्गाची परतफेड निसर्गाच्या भाषेत आपण करतच नाही आणि ही परतफेड न करणं आता अंगाशी येऊ लागला आहे.

या अर्थव्यवस्थेत भांडवल म्हणून फक्त पैसा किंवा मनुष्यबळ बघितले जाते पण आपण भांडवली खर्चामध्ये निसर्गाचे जे स्रोत वापरतो त्याची कोणतीच पर्यावरणीय किंमत लावत नाही. किंवा एखादी वस्तू वापरताना जर आपण हवा पाणी किंवा जमीन वगैरे वापरत असून तर त्याची वेगळी अशी किंमत आपण मोजत नाही. उदाहरणार्थ गाडी चालवताना जेव्हा पेट्रोल जळतो तेव्हा वापरला जाणारा ऑक्सिजन आपण फुकटच वापरतो. गाडीच्या उत्पादनासाठी जो कार्बन जाळला, जी खनिजं उपसली त्याची पर्यावरणीय किंमत जेव्हा आपण मोजायला लागू तेव्हा आपल्याला आपल्या कृतींची नीट जाणीव होईल.

माणसांची वाढती संख्या, तिला लागणारे अन्न पुरवण्यासाठी आणि त्या लोकसंख्येच्या दैनंदिन प्राथमिक व इतर वाढत्या गरजा पुरवण्यासाठी आपण पृथ्वीवरील बहुतेक भूभाग हडप केला आहे. याला इंग्रजीत human footprint अशी संज्ञा आहे. यात मानवी वस्त्या, माणसाने पाळलेली सर्व जनावरे (मासे, गुरे, डुकरे, कोंबडया, शेळ्या, बकऱ्या, मेंढरे, कुत्रे, मांजरी), या सर्व माणसांसाठी आणि त्यांच्या जनावरांसाठी जंगले तोडून चालवलेली शेती, त्यासाठी लागणारे पाणी, निवाऱ्याची सोय या सर्व गोष्टी माणसाच्या फूटप्रिंट मध्ये येतात. यातील मांसाहारासाठी आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी (दही, तूप, लोणी, चीज इत्यादी) पाळीव जनावरे हा प्रदूषणाचा मोठा स्रोत आहे. जगातली ७५% शेती ही माणसासाठी अन्न पिकवण्यासाठी होत नाही. या जनावरांचे अन्न तयार करण्यासाठी केली जाते. गायी म्हशी या मिथेन नावाचा एक वायू हवेत सोडतात. तपमान वाढीसाठी हा वायू कार्बन डाय ऑक्साईड पेक्षा २१ पट अधिक धोकादायक आहे.

Planetary boundaries
Planetary boundaries.png

२. ऊर्जेचा प्रश्न

पृथीवरील सर्व ऊर्जेचा स्रोत हा सूर्य आहे. ऊर्जा प्रत्येक कामासाठी ऊर्जा लागते.
फिजिक्समध्ये एंट्रॉपी नावाची संज्ञा आहे. त्याप्रमाणे एखादे काम करताना जी ऊर्जा लागते त्याच्याच बरोबर येणे बरोबरीने काही ऊर्जा ही वाया जात असते. तिला एंट्रॉपी असे म्हणतात. या एंट्रॉपीचा विचार केला तर ऊर्जेच्या स्रोतांचे दोन प्रकार सांगता येतील. एक ज्याच्यात एंट्रॉपी जास्ती आहे आणि दुसरी ज्याच्यात एंट्रॉपी कमी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सौर ऊर्जा ही अधिक एंट्रॉपी असलेली ऊर्जा आहे आणि पेट्रोल हे कमी एंट्रॉपी असलेलं इंधन आहे. म्हणजेच जेव्हा आपण सौरउर्जा वापरतो तेव्हा त्यातली बरीचशी उर्जा ही निरुपयोगी असते.

आता याचा पर्यावरणाच्या प्रश्नांची काय संबंध तर आपले हे जे पर्यावरणाचे सध्याचे प्रश्न आहेत ते खरं तर बरेचसे उर्जेचे प्रश्न आहेत. म्हणजे गाडी चालवायला जी ऊर्जा लागते ती आपण खनिज तेल वापरून मिळवतो आणि त्यातून कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होतो. वीज निर्मितीसाठी आपण कोळसा जाळतो त्यातूनही कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होतो आपल्या प्रत्येक कृतीसाठी आपण या ना त्या प्रकारे कमी एंट्रॉपी असणारे स्रोत वापरतो आहोत. ज्यातील बरेचसे स्रोत हे हवेचे प्रदूषण करतात. जगात clean energy/green energy या शब्दांचा बोलबाला आहे. दुसरा शब्द म्हणजे renewable energy. सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा हे ऊर्जेचे अपारंपरिक स्रोत आहेत आणि हे वापरले तर निसर्गाची हानी होत नाही. प्रदूषण होत नाही. मात्र यातील बरेचसे खरे नाही. या सर्व ऊर्जेच्या स्रोतांमुळे देखील प्रदूषण होते आणि यातील योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरले तर आणि तरच जल विद्युत आणि सौर ऊर्जा (सोलर panel मधून मिळणारी नाही)हे दोन स्रोत त्यातल्या त्यात बरे आहेत.

माणसाच्या वाढत्या भौतिक हव्यासापायी आपण ऊर्जेच्या अति वापराकडे झुकतो आहोत. शाश्वत विकासाची पहिली पायरी ही माणसाची संसाधनांची आणि ऊर्जेची एकूण गरज कमी करणे हीच आहे. पण मग आपण जगायचे तरी कसे? नव्या शाश्वत जगाचे चित्र कसे असले पाहिजे? हे आपण पुढच्या भागात पाहू!

काही युट्युब व्हिडीओज च्या लिंक्स
१. माणसाचा फूटप्रिंट म्हणजे काय? - https://www.youtube.com/watch?v=g_aguo7V0Q4
२. Earth overshoot day विषयी माहिती - https://www.youtube.com/watch?v=jgbY79Opn34&t=1s
३. Clean energy/green energy या फसव्या दिशाभूल करणाऱ्या ट्रेंड चा फोलपणा दाखवणारी डॉक्युमेंटरी - Planet of the humans - https://www.youtube.com/watch?v=Zk11vI-7czE&t=4201s
४. Electric car मुळे carbon footprint खरोखरच कमी होतो का? - https://www.youtube.com/watch?v=tikyHEvswUI&t=320s
5. ऊर्जेचा प्रश्न अतिशय सोप्या भाषेत मांडणारे एक उत्तम पुस्तक - The third curve - Mansoor Khan http://mansoorkhan.net/ हे पुस्तक या साईटवर निशुल्क उपलब्ध आहे.
6. मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थांमुळेहोणारे प्रदूषण - https://www.youtube.com/watch?v=hFwx7W-lx5w

लेख थोडा repetitive आणि विस्कळीत झालाय पण हातात फारसा वेळ उरत नसल्याने हे राहून जायला नको म्हणून तसाच प्रकाशित करत आहे. तीनही लेख लिहून एकदम प्रकाशित करू या overambitious इच्छेपायी काहीच होत नव्हते. आता लवकर दुसरे दोन्ही लेख प्रकाशित करायला कारण मिळेल असाही एक एक विचार आहे. सर्वांच्या प्रतिसादातून चांगली चर्चा घडावी अशी इच्छा आहे.

Keywords: 

चर्चाविषय: 

शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग २

पहिल्या भागाचा दुवा: भाग १

भाग २ आपल्याला कोठे जायचे आहे?

यामध्ये एकूण चार उद्दिष्ट मांडावीशी वाटतात.

१. मानवी भूभार कमी करणे - आधी आपण बघितले तसं माणसाने बरीच जमीन हडप केली आहे. ती जमीन निसर्गाला परत करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे नक्की काय करायचे तर सध्या जी औद्योगिक शेती केली जाते ती बहुतांशी रासायनिक असते. या औद्योगिक शेतीच्या प्रारूपाकडून नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याकडे वळणे. यात एका पिकाऐवजी अनेक पिके एकाच वेळी घेणे रासायनिक खते न वापरणे, आणि मांसाहार कमी करणे अथवा बंद करणे या गोष्टी येतात. समजा, आपण शंभर एकर जमीनीवर फक्त मका पिकवत असू तर त्या ऐवजी पाच ते दहा एकर जमीनीवर किमान 4 ते 5 विविध प्रकारच्या धान्य अथवा भाज्या लावणे. फिरती शेती, असे करता येईल. उरलेल्या जमिनीवर तिथल्या मूळ वनस्पती उगवतील असे पोषक वातावरण निर्माण करता येईल. मात्र केवळ झाडे लावून जंगल तयार करणे म्हणजे निसर्ग नव्हे. निसर्गाच्या अनेक परिसंस्था असतात - गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, रेतीचे मैदान, वाळवंट ह्या सगळ्या नैसर्गिक परिसंस्था आहेत. आपल्या भौगोलिक प्रदेशानुसार तिथली जी नैसर्गिक परिसंस्था आहे तिच्या परीघात राहून तेथील स्थानिक बियाणे वापरून शेती करणे हे शाश्वत विकासाचे एक महत्वाचे ध्येय आहे. या प्रकारे केलेली शेती ही भरपूर उत्पन्न देणारी, शेतकऱ्याला जगवणारी आहे हे अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. यातून मांसाहार व दुग्धजन्य पदार्थ यासाठी खर्च होणारे पाणी व उर्जा यांची बचत झाल्याने पृथ्वीवरील भार कमी होईल.

२. संसाधनांचे विकेन्द्रिकरण - सध्याची आपली अर्थव्यवस्था केंद्रिकरणावर भर देणारी आहे. चीनमध्ये माल उत्पादन करणे हे आर्थिकदृष्टय़ा स्वस्त पडते म्हणून तिथे सर्व जगातील वस्तूंचे उत्पादन केले जाते. अन्नधान्य, दूध, कपडे, पाणी, उर्जा या आपल्या दैनंदिन जीवनात गरजेच्या वस्तू देखील कधी कधी सातासमुद्रापार तयार झालेल्या असतात. मग त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विपणनाची एक मोठी साखळी तयार करावी लागते. या साऱ्याची नैसर्गिक किंमत आपण मोजत नसल्याने आर्थिकदृष्टय़ा आपल्याला ते परवडते. मात्र या साखळीतील एखाद्या गोष्टीवर बंदी आली तर काय भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते याची अगदी छोटी चुणूक आपल्याला कोरोना मुळे दिसली आहे. किमान अन्न आणि उर्जा या दोन बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या छोट्या छोट्या मानवी वसाहती निर्माण करणे हे शाश्वत विकासाचे एक महत्वाचे ध्येय आहे. आज भारतातल्या कुठल्याही शहरात पाणी दूरच्या धरणातून येते, धान्य भाजीपाला दूध आसपासच्या खेड्यातून येते, वीज दूरच्या कोणत्या तरी वीज केंद्रात तयार होते. या साऱ्या गोष्टी शहरात येतात पण शहरात काय तयार होते तर प्रदुषण, सांडपाणी आणि कचरा. पुन्हा या सर्व गोष्टी शहराबाहेर नेऊन प्रक्रिया करून सोडण्याची व्यवस्था निर्माण करावी लागते. या उलट शाश्वत प्रारूपात शहरातील प्रत्येक प्रभागात दैनंदिन गरजेचा भाजीपाला फळे पिकवता येईल, कदाचित एखादा गोठा असेल. सर्व प्रभागातील सांडपाण्यावर आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या पासून बायोगॅस तयार करता येईल. त्यातून तिथल्या लोकांची उर्जेची गरज भागू शकेल. गावाकडे हेच मॉडेल राबवले तर शहराकडे येणारे माणसांचे लोंढे कमी होतील. गावातील लोकांना गावातच अधिक चांगल्या प्रकारे जगता येईल. शेतीच्या जोडीला छोटे कुटीर उद्योग चालवता येतील. ही एक शोषण न करणारी शाश्वत अर्थव्यवस्था असेल.

३. चक्राकार अर्थव्यवस्था - या शाश्वत विकासाच्या स्वप्नांमध्ये उद्योग धंदे कसे चालतील? तर त्यासाठी circular economy चे प्रारूप मांडले आहे. यामध्ये कोणत्याही उत्पादनात कचरा निर्माण होणार नाही. कारण एका उत्पादनात तयार झालेला कचरा हा दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल असेल. हे उद्योग अर्थात जास्तीत जास्त विकेन्द्रीत आणि उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असतील. उदाहरणार्थ, आज आपण बिस्किटाचा पुडा घेऊन येतो. त्याच्या वेष्टनाची जबाबदारी कोणाची असते? शाश्वत उद्योग end to end responsibility घेणारा असेल. यालाच cradle to cradle approach अशी संज्ञा आहे. मग अशा परिस्थितीत कदाचित single use plastic चे वेष्टण बिस्किट कंपनीला परवडणार नाही! याच धर्तीवर जर आपली इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला परत घेण्याचा कायदा आला तर कदाचित मोबाईल कंपन्या इतक्या वेगाने नवीन मॉडेल्स आणणार नाहीत. कारण कंपनीला केवळ एका नवीन चीप साठी अख्खा फोन परत घेणे परवडणार नाही मग कदाचित ती एक चीप बदलून तोच फोन अधिक काळ वापरता येईल.

४. अपारंपरिक ऊर्जा स्रोत - मूळ उर्जेची गरज भागवण्यासाठी सौरऊर्जा आणि जलविद्युत हे दोन सर्वात चांगले पर्याय आहेत. मात्र त्यासाठी मोठी धरणे बांधण्यापेक्षा छोट्या छोट्या प्रमाणात विकेंद्रीत उर्जा निर्माण करणे आणि गरज पडल्यास ती ग्रिडने जोडणे अधिक शाश्वत आहे. सौर ऊर्जा सोलार पॅनेलच्या माध्यमातून वापरणे जरी सोयीचे असले तरी तो सर्वात चांगला पर्याय नाही. जशी मिळते त्या स्वरूपात सौर ऊर्जा वापरणे सर्वात सोपे आणि चांगले. यात गवत आणि शेतात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून तयार होणारा बायोगॅस हा एक शाश्वत पर्याय असू शकतो. मूलतः उर्जेची गरज कमी भासेल असे जीवनशैलीत बदल करणे हा एक मोठा बदल आध्यारूत आहे. उदाहरणार्थ, चालत, सायकलने, किंवा सार्वजनिक वाहनाने प्रवास, भरपूर सूर्यप्रकाश आणि उत्तम वायुवीजन व insulation असलेली शाश्वत पद्धतीने बांधलेली घरे इत्यादी मुळे उर्जेची गरज कमी होऊ शकते.

हे सगळं कसं शक्य आहे? हे अति आदर्श जवळपास युटोपिअन स्वप्नरंजन आहे असं वाटू शकतं. पण विचार केला तर या सर्व गोष्टी शक्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी कोणी तुम्हाला असं सांगितलं असतं की एका महिन्याहून अधिक काळ अख्खा भारत घरी बसून राहणार आहे तर आपल्याला कदाचित पटलं नसतं पण असं प्रत्यक्ष घडलं आहे! कोणतीही गोष्ट सत्यात आणायची असेल तर इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या दोनच गोष्टी लागतात. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे! आता या युटोपियाला प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण तिसऱ्या भागात पाहू.

अधिक विस्ताराने माहितीसाठी उपयुक्त लिंक्स

१. Permaculture/polyculture
https://youtu.be/oCZ-t30aCeQ

२. शेतीचे कारखाने आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम
https://youtu.be/7TRI7yeeYQQ

३. चक्राकार अर्थव्यवस्था म्हणजे काय?

https://youtu.be/zCRKvDyyHmI

https://youtu.be/7b9R82vrA40

Keywords: 

चर्चाविषय: