जेव्हा पर्यावरणाच्या प्रश्नांची जाणीव झाली तेव्हा अर्थात पहिला काही काळ कार्बन फूटप्रिंट, प्रदूषण, एनर्जी फुटप्रिंट वगैरे संकल्पना समजून घेणे आणि जगात चालू असलेल्या विविध पातळीवरच्या उपायांनी भारावून जाणे यात गेला. त्यातही तंत्रज्ञानातील प्रगती ही फारच भुरळ पाडणारी! मग electric वाहने, वेगवेगळ्या बॅटरीज, सर्व प्रकारची सौरउर्जेवर चालणारी उपकरणे, बायोगॅस, रिसायकलिंग सर्वांविषयी वाचलं, ऐकलं, चर्चा केली. मग इकॉलॉजीच्या कोर्समध्ये निसर्गाविषयी, त्याच्या विविध परिसंस्थांविषयी माहिती, वाचन, त्यांचा अभ्यास हे घडलं.
गेले काही महिने एका गटाबरोबर पर्यावरण विषयाचा अभ्यास करते आहे त्यातून तयार झालेले काही विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही गोष्टी तुमच्या माहितीच्या असतील आणि काही नवीन असतील पण साकल्याने विचार केला तर आपल्यातल्या प्रत्येकाला यातून एक विचारांची नवीन दिशा सापडेल अशी मला आशा वाटते.