या गेल्या तीन चार महिन्यात जिझेल पेलिकॉट ही ७२ वर्षांची 'साधीसुधी' आजी फ्रान्सच्या (आणि इतर जगाच्याही) पुरुषसत्ताक कायद्यांना आव्हान ठरली आहे. तिने तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर तिने एक महत्त्वाचं (आणि तसं साधंच) मत मांडलं - की शरम पलिकडच्या बाजूला वाटायला हवी - ज्याने अत्याचार केला, बलात्कार केला त्याला. शरम नाहीच, पण तिने दाखवली ती बिनतोड हिंमत.
परभणीजवळ आहे साडेतीन हजार वस्तीचे केरवाडी गाव. इथे आहे सूर्यकांतकाका कुलकर्णी व माणिकताई कुलकर्णी यांच्या स्वप्नातून उभी राहीलेली ‘स्वप्नभूमी’! शेकडो अनाथ मुलांना आत्तापर्यंत सांभाळून, पालनपोषण करून स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत करणारा.. अनाथाश्रम? नव्हे नव्हे हे तर घर आहे, त्या मुलांसाठी ही आहे स्वप्नभूमी!
(तुम्हा सगळया मैत्रीण सदस्यांपर्यंत त्यांचे कार्य पोचवावं असं वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. माझे आईबाबा नुकतेच तिकडे जाऊन सर्व पाहून अनुभवून आले, तेव्हा त्यांनी माणिकताई व सूर्यकांतकाकांशी संवाद साधला – तो असा.)
चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्हं यांचं अगदी जवळच नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीच हळदीकुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीच पन्हं खुप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार ठिकाणी होतं नसलं तरी गुढी पाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अश्या निमित्ताने अजून ही घरोघरी चैत्रात पन्हं आवर्जून केलं जातं.
Rheinland Pfalz - ह्राईनलांड फाल्झ हे जर्मनीच्या दक्षिण भागातलं एक राज्य. आम्ही वेगळ्या राज्यात असलो, तरी गाडीने दहाव्या मिनिटाला आम्ही या पलीकडच्या राज्यात पोचतो इतकं ते जवळ आहे. याच राज्यातल्या एका मार्गाचे नाव आहे Deutsche Weinstraße - जर्मन वाईन रोड. द्राक्षांच्या शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या राज्यात, Schweigen-Rechtenbach या फ्रान्स बॉर्डर जवळच्या गावापासून सुरू होऊन Bockenheim पर्यंत साधारण ८५ किलोमीटर रस्ता हा जर्मन वाईन रोड म्हणून ओळखला जातो.
What if तुम्हाला 15 वर्षांचे असताना घर सोडून, जग सोडून पळून जावंसं वाटतं, what if अगदी लहान असल्यापासून बापाने वारंवार तुम्हाला अत्यंत हीन शाप दिला आहे, ज्याच्यापासूनही तुम्हाला पळायचं आहे?
What if शाळेत असताना तुम्ही खूप बुद्धिमान असता आणि एका घटनेनंतर कोमात जाता, जागे झाल्यावर तुम्ही लिहिण्या वाचण्याबरोबर, इच्छा आकांक्षा, नाती, वासना सगळं काही विसरून जवळजवळ विरक्त होता आणि मांजराची भाषा समजू लागता?
What if तुम्ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तुमची प्रिय व्यक्ती गमावून बसता आणि वीसेक वर्षांनंतरही त्याच काळात अडकलेले राहता?
आज इस्टोनियात वास्त्लापाएव (Vastlapäev) १ आहे. ख्रिसमसइतकीच उत्सुकता इथे असते ती फेब्रुवारीतल्या 'वास्त्लापाएव' ची. सण निमित्तमात्र, वर्षभर या दिवसाची वाट बघितली जाते ती लुशलुशीत, मुरांब्याने भरलेले 'वास्त्लाकुक्केल' (Vastlakukkel) २ खाण्यासाठी. आमच्या घरात या क्रिम भरलेल्या पावांना 'कुक्केल' असं प्रेमाचं नाव आहे. खरंतर फेब्रुवारी महिना म्हणजे हिमवृष्टी, बर्फाचा जोर. कधी कधी हिमवादळंसुद्धा. पण निसरडे बर्फाळ रस्ते तुडवत गल्लीतल्या बेकर्यांमधले कुक्केल चाखण्याची मजा काही औरच.
एके रात्री उशिरा चित्रपट बघून मॉल मधून बाहेर पडलो. गाडीतून रस्त्यापलीकडची झाडं पूर्ण आणि नीट दिसत होती. दोन मिनिटं कळलंच नाही काय बघतोय आणि मग मन थाऱ्यावर आलं तेव्हा जाणवलं काय पाहिलं. ऊंचंच उंच झाडांवर चांदण्या लगडल्या होत्या. अगदी बहरलेल्या. झुंबरा सारख्या. अंधारात उजळून निघालेल्या. सगळी झाडं सोहळा साजरा करत होती. त्यांच्या आगमनाचा आणि असण्याचा. मी भान हरपून आणि मागे वळून बघत राहिले.
.
नुकताच म्हणजे ३ डिसेंबर रोजी दुपारी पुण्यात स.प महाविद्यालयाच्या मैदानावर गीता पाठ महायज्ञ झाला. दहा हजाराहून जास्त लोकांनी एका सुरात, एका लयीत गीतेच्या अठरा अध्यायांचे पारायण केले. त्याबद्दलचे माझे चार शब्द.