What if तुम्हाला 15 वर्षांचे असताना घर सोडून, जग सोडून पळून जावंसं वाटतं, what if अगदी लहान असल्यापासून बापाने वारंवार तुम्हाला अत्यंत हीन शाप दिला आहे, ज्याच्यापासूनही तुम्हाला पळायचं आहे?
What if शाळेत असताना तुम्ही खूप बुद्धिमान असता आणि एका घटनेनंतर कोमात जाता, जागे झाल्यावर तुम्ही लिहिण्या वाचण्याबरोबर, इच्छा आकांक्षा, नाती, वासना सगळं काही विसरून जवळजवळ विरक्त होता आणि मांजराची भाषा समजू लागता?
What if तुम्ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तुमची प्रिय व्यक्ती गमावून बसता आणि वीसेक वर्षांनंतरही त्याच काळात अडकलेले राहता?
What if तुम्ही स्वप्नात तुमच्या इच्छा/शाप पूर्ण होताना
फक्त पाहूच शकत नाही तर प्रत्यक्ष स्थूलकाळात येऊन, तिथे शरीराने वावरून त्या पूर्ण करू शकता?
What if तुम्ही तुमचं रोजचं एकरेशीय आयुष्य जगत असता आणि नशिबाने ठरवून केल्याप्रमाणे कदाचित संपूर्ण आयुष्यातही येणार नाहीत असे अनुभव एका आठवड्यात भरून निघतील अशा प्रसंगातून जाता, what if तुम्ही इतके कॉमन आणि जगासाठी निरुपयोगी आहात आणि एकाएकी जगाला वाचवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी तुमची निवड होते?
What if देवाने तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत जन्मतःच तुम्हाला गोंधळून टाकलेलं आहे, what if तुम्ही जगण्या मरण्याच्या सीमारेषेवर असे उभे आहात की एक बारीकशी टाचणी तुमचे आयुष्य संपवू शकते?
What if जेव्हा ही सगळी नशिबाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे गंडवलेली मंडळी एकमेकांबरोबर गोवली जातात, काही प्रत्यक्ष, काही अप्रत्यक्षपणे..
जिगसॉ पझल प्रमाणे हे वेगवेगळे, बेढब आकार एकत्र येऊन खूप मोठा युनिव्हर्सल इव्हेंट घडवतात आणि संपवतात ही !
What if एखादे पुस्तक वाचून ते तुम्हाला 100% एक्स्प्लेन करता आलं नाही म्हणजे तुम्हाला पुस्तक खरोखर समजलं असू होऊ शकेल?
What if काफ्का ऑन द शोअर वर्षाच्या सुरवातीलाच तुमचं वर्षातील सर्वात आवडलेलं पुस्तक होऊन बसेल??