दक्षिणेतील प्लँटेशन्समधील प्रचंड मेहनतीला, जाचाला, खच्चीकरणाला कंटाळून स्वतःच्या जिवावर उदार होऊन काही स्लेव्ह्ज पळून जाण्याचा प्रयत्न करीत. काही जण उत्तरेतील मुक्त राज्यात पळून जाण्यात यशस्वी ठरत. आपल्या कुटुंबाला कसे तरी करुन आणण्याची त्यांची धडपड सुरु होई. उत्तरेतील अॅबॉलिशनिस्ट्स आणि त्यांच्या समर्थकांनी 'अंडरग्राउंड रेलरोड' नावाखाली या गुलामांना फ्री स्टेट्स आणि कॅनडमध्ये पळून जाण्याकरता सुरक्षित घरांची साखळी सुरु केली. या घरातील लोक पळून आलेल्या गुलामांना आपल्या घरी आसरा देऊन फार मोठी जोखीम पत्करायचे. रात्री, अंधारात लपून छपून हे गुलाम एका घरातून दुसर्या घरी हलवले जायचे.
“कपड्यांची कथा! पण या सगळ्या कथेचा आपल्या आयुष्याशी कुठे संबंध येतो?” हुशार मकूने हुशार प्रश्न विचारला. ठकू समजावून सांगू लागली.
अंगावर ल्यायलेली प्रत्येक गोष्ट, कपाटातली प्रत्येक वस्तू या सगळ्या कथेचा एक भाग आहे. आपलं कपाट उघडून पहा. सत्राशेसाठ प्रकारचे कपडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कापडे, वेगवेगळ्या प्रकारची पद्धत आहे. ठराविक ठिकाणी घालायचे ठराविक कपडे आहेत. ‘मेरावाला क्रीम’ पासून म्हणाल तितके रंग आणि छटा आहेत. आपण मध्यमवर्गीयच आहोत, काटकसरीही आहोत पण कपड्यांचं कपाट भरून वाहतंय.
दर वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा केला जातो. १९७६ सालापासून सुरु झालेल्या या उपक्रमाद्वारे फेब्रुवारी महिन्यात चर्चा, परिसंवाद, लेख, कला याद्वारे कृष्णवर्णीय वंशाच्या लोकांचा इतिहास, वारसा, विविध कार्यक्षेत्रामधील त्यांची कामगिरी आणि योगदान, कृष्णवर्णीय समाजायुष्यातील विविध पैलू हे लोकांसमोर आणले जातात. गेली ४०० वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो.
'एक व शून्याचे जग' ह्या कम्प्युटरविषयी लेखमालिकेच्या पहिल्या भागात तुमचे स्वागत आहे! पहिला भाग म्हणतोय आणि टायटलमध्ये भाग ० का? तर कम्प्युटर जगात साधारणतः कुठलीही पहिली गोष्ट ही शून्यापासून सुरु होते. म्हणून आपणही तीच पद्धत चालू ठेऊया.
“ती कार्यकर्ती आहे? वाटत नाही अजिबात. साडी पाह्यलीस का तिची? कॉटन बिटन नाहीये. व्यवस्थित फुलांचं डिझाईन आहे आणि नायलॉनची दिसते आहे. कार्यकर्तीचा साधेपणा कुठेय यात? ” ठकूच्या कार्यकर्त्या मैत्रीणीबद्दल कुणी तरी कुजबुजलं. कुजबूज काकू पण कार्यकर्त्या होत्या. त्यांचा कार्यकर्ती म्हणून गणवेश एकदम मान्यताप्राप्त होता. मस्तपैकी हातमागावरची साधी कॉटन साडी नेसल्या होत्या. ठकूच्या मैत्रिणीची साडी चारशे रुपयांची आणि कुजबूज काकूंची साधी साडी हातमागाची म्हणजे हजार दीडहजाराच्या घरातली तरी असावीच. ठकूने हसून खांदे उडवले.