BlackLivesMatter

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ७)

१९६० चे दशक हे कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्काकरता निर्णायक होते. १९६४ साली सिव्हील राईट्स कायद्यानुसार अमेरिकेतील सेग्रिगेशन संपले, १९६५ च्या वोटींग राईट्स कायद्यानुसार मतदानाकरता नोंदणी आणि मतदान या दोन्ही बाबींमध्ये पारदर्शकता आणण्यात आली, १९६८ च्या फेअर हाउसिंग कायद्यानुसार घराकरता कर्ज घेताना, घर विकत/भाड्याने घेताना, विकताना कृष्णवर्णीयांविरुद्ध वर्णभेद करणे बेकायदेशीर झाले. कृष्णवर्णीय समाज मुख्य धारेत आणण्याकरता हे तिन्हीही कायदे महत्त्वाचे ठरले. १९६८ साली शर्ली चिझम ही अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडली गेलेली पहिली अफ्रिकन अमेरिकन महिला ठरली.

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ५)

होमर प्लेसी हा लुइझियाना राज्यातील न्यू ऑर्लियन्स शहराचा रहिवाशी होता. तो वंशाने एक अष्टमांश अफ्रिकन अमेरिकन होता. त्याचे मूळचे फ्रेंच असलेले आजोबा हे अठराव्या शतकात न्यू ऑर्लियन्सला आले. तिथे त्यांनी अफ्रिकन अमेरिकन वंशाच्या 'फ्री' स्त्रीशी लग्न केले. होमरच्या आईच्या बाजूचा सगळा परिवार हा श्वेतवर्णीय होता. त्याच्या उजळ त्वचेमुळे त्याच्या पूर्वजांविषयी माहिती नसलेल्या लोकांमध्ये तो श्वेतवर्णीयच समजला जायचा पण सेग्रिगेशनच्या नियमानुसार, एका अफ्रिकन पूर्वजामुळे त्याला कृष्णवर्णीयांना लागू होणारे सर्व नियम लागू व्हायचे, पाळावे लागायचे.

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ४)

९ एप्रिल १८६५ साली व्हर्जिनियामध्ये कन्फेडरेट सैन्याचा सेनापती जनरल रॉबर्ट इ ली याने शरणागती पत्करली आणि अमेरिकेत ४ वर्ष सुरु असलेले उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमधील युद्ध संपले. या युद्धाने जवळपास सहा लाखांच्या वर सैनिकांचा आणि हजारो नागरिकांचा बळी घेतला. पराभवाबरोबरच लाखो मुलगे, वडील, भावंडे यांचे मृत्यू, जप्त झालेली जमीन, बेचिराख झालेली शहरे, खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था याने दक्षिणेतील राज्ये पोळून निघाली, संतप्त आणि हतबल झाली.या पराभवाचे खापर कोणावर तरी फोडणे क्रमप्राप्त होते. ते साहजिकच नवमुक्त गुलामांवर फोडले गेले.

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ३)

दक्षिणेतील प्लँटेशन्समधील प्रचंड मेहनतीला, जाचाला, खच्चीकरणाला कंटाळून स्वतःच्या जिवावर उदार होऊन काही स्लेव्ह्ज पळून जाण्याचा प्रयत्न करीत. काही जण उत्तरेतील मुक्त राज्यात पळून जाण्यात यशस्वी ठरत. आपल्या कुटुंबाला कसे तरी करुन आणण्याची त्यांची धडपड सुरु होई. उत्तरेतील अ‍ॅबॉलिशनिस्ट्स आणि त्यांच्या समर्थकांनी 'अंडरग्राउंड रेलरोड' नावाखाली या गुलामांना फ्री स्टेट्स आणि कॅनडमध्ये पळून जाण्याकरता सुरक्षित घरांची साखळी सुरु केली. या घरातील लोक पळून आलेल्या गुलामांना आपल्या घरी आसरा देऊन फार मोठी जोखीम पत्करायचे. रात्री, अंधारात लपून छपून हे गुलाम एका घरातून दुसर्‍या घरी हलवले जायचे.

Keywords: 

लेख: 

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग १)

दर वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा केला जातो. १९७६ सालापासून सुरु झालेल्या या उपक्रमाद्वारे फेब्रुवारी महिन्यात चर्चा, परिसंवाद, लेख, कला याद्वारे कृष्णवर्णीय वंशाच्या लोकांचा इतिहास, वारसा, विविध कार्यक्षेत्रामधील त्यांची कामगिरी आणि योगदान, कृष्णवर्णीय समाजायुष्यातील विविध पैलू हे लोकांसमोर आणले जातात. गेली ४०० वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो.

Keywords: 

लेख: 

Subscribe to BlackLivesMatter
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle