नाही नाही, इम्रान हाश्मी अंगात आला नाहीये अजून! एवढं ओरडतेय फक्त ड्रिंक्ससाठी. आज जरा घसा ओला करूया. तुर्क अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही प्रकारची पेये पितात. आधी नॉन-अल्कोहोलिक पासून सुरू करू:
चाय: तुर्की चायबद्दल सगळं काही आधीच ब्रेकफास्टच्या भागात सांगून झालं आहे. येता, जाता, बसता, उठता चाय पित राहणे हे तुर्की जीवनाचे सार आहे!
एवेssट, आतापर्यंत इतका जड काहवाल्ती पचला असेल समजून जेवणाकडे वळूया. ब्रेकफास्ट इतका दमदार केल्यामुळे तुर्की जेवण तसं सोपं असतं. दुपार आणि रात्रीच्या जेवणातले पदार्थ तसे आलटून पालटून सारखेच असतात.
हाय मैत्रीणींनो,
ऑगस्ट पासून एका नवीन व्यवसायात हात घातला आहे.
100% नॅचरल प्रोडक्ट, essential ऑइल रिलेटेड गोष्टी आवडतात शिवाय कोकणातील उत्पादनाबद्दल काहीतरी करायचे असा विचार होता. काजू आणि नारळाच्या बागाही आहेत त्यामुळे नारळाशी संबंधित व्यवसाय करायचे असेही काहीसे डोक्यात होते.
गेल्या काही महिन्यात सगळ्या गोष्टी जमून आल्यात आणि नवीन ब्रँड सुरु केलाय.
रणरणत ऊन, घामामुळे होणारी चिडचिड, भरं दुपारी फार नसला तरी तीन चार किलोमीटरचा करावा लागलेला प्रवास, अगदी नको वाटतं होतं. काम पण तसंच महत्त्वाचं होतं त्यामुळे बाहेर पडण्या शिवाय काही पर्याय नव्हता. कसलं ते ऊन, रस्त्याने जाणारा येणारा चांगलाच होरपळत होता.
माझ्यासारखी सगळ्यांचीच इच्छित स्थळी पोहचण्याची घाई, खरं तर गारव्याच्या ठिकाणी पोहचण्याची घाई. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवजा दुकानात पेपरने हवा घेणारापण् जगातला सर्वात सुखी माणूस भासतं होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची सावली म्हणजे टप्प्या टप्पाणे हातात आलेल सरकारी अनुदान.
पहिला मुलगा झाला तेव्हाच तिच्या लक्षात आलं होतं तिच्या जाणीवा चारचौघींसारख्या नाहीत.
सतत पिरपिर करणारं ते मूल तिला अगदी नको नको झालं होतं. नवऱ्याच्या सरकारी नोकरीमुळे राहायला मिळालेलं ते भकास क्वार्टर. तिथे सकाळपासून दुपारपर्यंत सतत घुमणारं बाळाचं रडू. कधी कधी वाटायचं त्या जीवाला उचलावं आणि फेकून द्यावं वरच्या मजल्यावरून. असा विचार आला की तिला स्वतःचीच भीती वाटायची. नवरा जेवायला घरी यायचा तेव्हा कशीतरी ती भाजी पोळी करायची शक्ती आणायची. पण नवरा घराकडे बघून वैतागायचा.
"काय करतेस तू दिवसभर? बाळ झोपलेलं असताना थोडं घर नीट ठेवता येत नाही का?"
त्वचेच्या रंगांवरून अगदीच वेगळे ओळखे जाऊ अशा देशात मी राहतेय सध्या. आपण कितीही म्हटलं तर मनाच्या एका कोपऱ्यात आपण खरंच सामावले जाऊ का इथल्या लोकांच्यात हा प्रश्न येतोच. मुलाची शाळा इंटरनॅशनल स्कूल. त्यात जगाच्या चारी कोपऱ्यातून आलेली पिल्लं. माझ्या पिल्लासारखीच. हसरी पण नवीन जागेला बावरलेली. पण ती एकमेकांचे छान दोस्त होतात. नवऱ्याच्या ॲाफिसमध्येही तसेच पूर्ण जगभरातून आलेले लोक. पण काम करता करता त्यांचीही गट्टी होते. राहता राहिले मी. सध्या ऑफिसला जात नसल्याने माझा तो लोकांच्यात मिसळायचा मार्ग नाही. मग उरतात मला रोज भेटणारे लोक.
साधारण 14 15 वर्षांपूर्वी आतासारखे स्वतंत्र म्युजिक चॅनल्स नसायचे. सोनी वगैरे सारख्या रेग्युलर चॅनेल वर चार्टबस्टर्स, म्युजिक मंत्रा सारख्या दिवसातून 3- 4 वेळा लागणाऱ्या 15- 30 मिनिटांच्या कार्यक्रमात गाणी, पॉप अलबम्स, सिनेमांची काही सेकंदांची झलक ,ज्याला आता टिझर म्हणतात, दाखवली जात असे. नवीन सिनेमे येत नाहीत तोवर रोज त्याच त्या गाण्याची इटरेशन्स चालायची. मला केवळ गाण्यांसाठी या कार्यक्रमाचे भयंकर वेड होते. यांचे ठराविक वेळापत्रक लक्षात ठेवून जमेल त्या वेळेला तीच ती गाणी पाहण्यासाठी मी टपून असायचे. 2004 साली वीर जारा च्या " मै यहा हु यहा' गाण्याची झलक त्यावर येऊ लागली.
गेम ऑफ थ्रोन्समधल्या माझ्या आवडत्या व्यक्तिरेखेबद्दल खूप दिवसांपासून लिहिणार होते ते फायनली काल फेसबुकवर लिहिलं. इथल्या बऱ्याच जणी त्या ग्रुपवर नाहीत म्हणून इथेही लिहिते आहे.