लेख

चिठ्ठी भाग 4

चिठ्ठी भाग 3 -
https://www.maitrin.com/node/3951

मुग्धा ओट्यावर हताश होऊन बसली होती. प्यायचं पाणी आलं होतं नळाला. सर्वांना पाणी मिळावं या उद्देशाने शोभाताईंनी नळाचं connection आतवर करून घेतले नव्हते. इतर वेळी सर्व बोअरचं पाणी वापरत. नळाला पाणी आलं की ते भरून झाल्यावर शोभाताईंना एक दोन हंडे-कळशी भरून देत.
शोभाताई बाहेर गेल्यामुळे मुग्धा पाणी भरायला बाहेर आली. ओट्याच्या पायर्यांजवळच खाली नळ होता. तिने कळशी भरायला ठेवली. पण ती काही भरेचना!
कळशी भरली की भिर्रकन अनुची स्वारी तिथं प्रकट व्हायची आणि 'दिदी तेरा देवर दिवाना' - या गजरात ती पालथी करायची! किती नको म्हटलं तरी अनु कुठे ऐकणार होता?

Keywords: 

लेख: 

चिठ्ठी भाग 3

चिठ्ठी भाग 2 - https://www.maitrin.com/node/3949

आतून अनुला आईबाबांचं बोलणे ऐकायला येत होते.
"कुठे उधळलेत चिरंजीव? आज तरी शाळेत जाणार का?"
"राहू द्या हो. चिंगी नाहीये ना इथे. म्हणून भिरभिरलाय जरा."
'कशी गोड माझी सुमाक्का!'

Keywords: 

लेख: 

चिठ्ठी भाग 2

चिठ्ठी भाग 1- https://www.maitrin.com/node/3948

"एखादं छानसं भजन म्हण ना मुग्धा", वाती तुपात बुडवत शोभाताई म्हणाल्या.
"कुठलं म्हणु?"
"कुठलंही म्हण अगं ", अनुला जवळ घेऊन कुरवाळत शोभाताई म्हणाल्या.
"किती वेळ लावशील? मी असतो तर आतापर्यंत म्हणून देखील झालं असतं आणि प्रसाद देखील खाऊन झाला असता..देवाचा", अनुची बडबडीकडे दुर्लक्ष करून मुग्धाने गायला सुरवात केली.

"तुझी पदकमले मज शतकोटी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी

तुझ्या पद-धुळीची आस देवा
नित्य नव्याने घडू दे सेवा
राहू दे तुझे आशिष पाठी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी
तुझी पदकमले मज शतकोटी||"

Keywords: 

लेख: 

चिठ्ठी भाग 1

"काक्कुआज्जी!"
ती चिरपरिचीत हाक हवेत विरते न विरते तोच फाटक सताड उघडे टाकून तो धापा टाकत आत पळत आला. फाटकाची कडी त्याचा हात जेमतेमच पुरत असे. तरी तो प्रयत्न करून फाटक उघडायचाच. ती हाक शोभाताईंनाच उद्देशून आहे हे ताडले तरी मुग्धा बैठकीत आली.
"कोण आहे? "
अंगावर जेमतेम कपडे घालून त्याच्यापेक्षा मोठ्या टाॅवेलला सावरत उभ्या त्या बटूला बघून तिला हसू आलं. तरी तिने वरकरणी सरळ चेहरा ठेवत पुन्हा विचारलं, "कोण बरं?"
"अण्ड्राग"
"काय? Android?!", नव्यानेच अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला course आठवला मुग्धाला.
"नै कै. अ..न..रा..ग"

Keywords: 

लेख: 

आनंदवन मोमेंटस!

एक दिवस शीतल आमटेचा मेसेज आला. शीतल सोशल मिडिया मैत्रिण होती बरेच दिवस. तिला माझं वायरवर्क आवडलंय हे ती सांगेच वेळोवेळी. तर तिचा मेसेज आला की आमच्याकडे दिव्यांग लोकांसाठी वायर ज्वेलरीचं वर्कशॉप घेशील का?
आनंदवनासंबंधी महारोग्यांची सेवा, उपचार, पुनर्वसन याबद्दल थोडीफार कल्पना होती. समिधा वाचलेले असल्याने कश्या प्रकारे हे काम उभे राह्यले हे ही साधारण माहिती होतेच. जलसंधारणाच्या कामाबद्दलही पुसटशी माहिती होती. त्यामुळे कधीतरी आनंदवनाला भेट द्यायचीये हे पक्के डोक्यात होते. आता तर काय आयतीच संधी चालून आली.

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स १० : नविन घर, जुनाच गोंधळ!

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
--------------------------------------------------------------------------------------------------

लेख: 

'just cut my hair short'

का छोटेखानी पण प्रोफेशनल पार्लर मध्ये 'ती' वाट बघत बसलेली आहे. काही तरुणी, मध्यम वयाच्या स्त्रिया, अगदी नववधू देखिल, असा बर्यापैकी लावाजमा अवती-भोवती पहायला मिळतो. कोणी नुसतीच चेहर्यावर रंगरंगोटी चढवत आहे. तर कोणी भारीतले स्पेशल फेशियल, कोणि ब्लिच आणि काय-काय ते सगळ मेकपचेकप करण्यात दंग आहेत. मध्येच हसण्या खिदळण्याचा आवाज. यात भर म्हणुन काही-बाही बायकांच्या रंगलेल्या गप्पाठप्पा सुरू आहेत. पण तीचा चेहरा मात्र भावभावनांचा लवलेशही नसलेला, अगदी पांढरा फट, निर्विकार.

"टिंग...टिंग...नेक्स्ट कस्टमर प्लिज!" नंबर आल्याच समजल्यावर ती आतमध्ये चेअरवर जाऊन बसते.

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

अनारसे (न) हासरे

डोक्यात काहीतरी नवीन खूळ येतं आणि ते शांत बसू देत नाही. मागच्या वर्षी लेकीकडे युएसएला गेलो होतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच होता. वाचून वाचून किती वाचणार आणि पाहून पाहून किती टीव्ही बघणार? नवरात्र झाल्यावर इंडियन स्टोअरमध्ये गेलो तर मराठी/भारतीय फराळाच्या पदार्थाने व दिवाळीच्या सामानाने दुकाने भरलेली, सजलेली होती. डाॅलर किंमती म्हणजे त्याचे रुपयांतर बघून डोळे विस्फारले. त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात व चविष्ट पदार्थ घरी करता येऊ शकतो, असा ठराविक पिढीजात ममव (मराठी मध्यमवर्गीय) विचार आला नाही तर... असं कसं बरं व्हावं...???

Keywords: 

लेख: 

cord cutting...

आमची गेल्या काही वर्षात सीझन्ड कॉर्डकटर्स होण्याकडे वाटचाल चालली आहे. कॉर्ड कटींग म्हणजे केबल वगैरे बंद. आमचीही वाटचाल करण्यामागे दोन कारणे आहेत अर्थात. १) पैसे वाचवणे. २) आयुष्यातील noise  कमी करणे. सेन्सरी ओव्हरलोड कमी करणे.

इकडे अमेरिकेत विशेषतः केबल भयंकरच महाग आहे! ४०-५० $ पासून सुरवात होत १००-१५०-१८० $ असं कितीही वाढू शकते बील. ह्यामध्ये साधारण १० पासून २५०-४५० इतके चॅनल्स बघायला मिळतात.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

तुर्की - खाना-पीना-जीना - ४ तातलीलार (desserts)

माणसांमुळे डोळे अतीगोड (चोक तातलं) :fadfad: होऊन निवलेच आहेत तर आता जीभ गोड करण्याकडे वळूया. तुर्की दोन खंडांच्या काठावरचा देश असल्यामुळे एशियन आणि युरोपियन पदार्थांचा अगदीच गोड संगम झाला आहे. त्यामुळे शाकाहारींसाठी तर गोडाचे भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. अगदी आपल्या गोडाच्या शिऱ्यापासून ते स्पॅनिश चुरोपर्यंत सगळंच त्यांनी आपलंसं केलं आहे.

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to लेख
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle