डोक्यात काहीतरी नवीन खूळ येतं आणि ते शांत बसू देत नाही. मागच्या वर्षी लेकीकडे युएसएला गेलो होतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच होता. वाचून वाचून किती वाचणार आणि पाहून पाहून किती टीव्ही बघणार? नवरात्र झाल्यावर इंडियन स्टोअरमध्ये गेलो तर मराठी/भारतीय फराळाच्या पदार्थाने व दिवाळीच्या सामानाने दुकाने भरलेली, सजलेली होती. डाॅलर किंमती म्हणजे त्याचे रुपयांतर बघून डोळे विस्फारले. त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात व चविष्ट पदार्थ घरी करता येऊ शकतो, असा ठराविक पिढीजात ममव (मराठी मध्यमवर्गीय) विचार आला नाही तर... असं कसं बरं व्हावं...???