डोक्यात काहीतरी नवीन खूळ येतं आणि ते शांत बसू देत नाही. मागच्या वर्षी लेकीकडे युएसएला गेलो होतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच होता. वाचून वाचून किती वाचणार आणि पाहून पाहून किती टीव्ही बघणार? नवरात्र झाल्यावर इंडियन स्टोअरमध्ये गेलो तर मराठी/भारतीय फराळाच्या पदार्थाने व दिवाळीच्या सामानाने दुकाने भरलेली, सजलेली होती. डाॅलर किंमती म्हणजे त्याचे रुपयांतर बघून डोळे विस्फारले. त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात व चविष्ट पदार्थ घरी करता येऊ शकतो, असा ठराविक पिढीजात ममव (मराठी मध्यमवर्गीय) विचार आला नाही तर... असं कसं बरं व्हावं...???
आनंद व्यक्त करायचं सर्वात सहज आणि सुरेख साधन म्हणजे हसरा चेहरा... आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची स्माईल्स, हास्य आपण रोज बघत असतो.. ती फोटोन्मधून साठवून ठेवायला हा धागा!
"मला स्माईल्स कलेक्ट करायचा छंद आहे" असा काहीसा एक डायलॉग अनुशा दांडेकर तिच्या इंग्रजी मराठीत एका फिल्ममध्ये म्हणते. ( हे आपलं उगाच, पहिलं वाक्य लिहिताना आठवलं म्हणून...)
चला , आपणही हसरे चेहरे कलेक्ट करूयात :)
आनंदाची तशी जराशी जुनी गोष्ट नव्याने इथे टाकते आहे.
-----
मुंबईचा मुसळधार पाऊस... अर्ध्या तासापूर्वीच शिवडी स्टेशनवरच्या कधी काळी ९:३० ला बंद पडलेल्या घड्याळानी बरोबर वेळ दाखवली होती... रुळावर पाणी भरलेलं, फलाटावरच्या कोरड्या जागा लोकांनी पकडलेल्या आणि इंडिकेटरवर शून्य शून्य शून्य शून्य !
"८ टक्केच राहिल्ये बेटरी... ट्रेन माहित नाही कधी येईल... पहाट होईल बहुतेक घरी पोचायला.. हो... वडापाव... ठेव.. मी बंद करतोय हा फोन...हो हो.. डोंबलाची गुड नाईट... तिला बंद करायला सांग टीव्ही, गेल्या पावसाळ्यासारखा उडाला न तर बघ.. ठेव.. "