आनंदाची तशी जराशी जुनी गोष्ट नव्याने इथे टाकते आहे.
-----
मुंबईचा मुसळधार पाऊस... अर्ध्या तासापूर्वीच शिवडी स्टेशनवरच्या कधी काळी ९:३० ला बंद पडलेल्या घड्याळानी बरोबर वेळ दाखवली होती... रुळावर पाणी भरलेलं, फलाटावरच्या कोरड्या जागा लोकांनी पकडलेल्या आणि इंडिकेटरवर शून्य शून्य शून्य शून्य !
"८ टक्केच राहिल्ये बेटरी... ट्रेन माहित नाही कधी येईल... पहाट होईल बहुतेक घरी पोचायला.. हो... वडापाव... ठेव.. मी बंद करतोय हा फोन...हो हो.. डोंबलाची गुड नाईट... तिला बंद करायला सांग टीव्ही, गेल्या पावसाळ्यासारखा उडाला न तर बघ.. ठेव.. "