नुकतेच मस्त भटकंती करून आलो. लेकाच्या ड्रायव्हरकीमुळे अगदी मस्त झाली भटकंती ! जाताना आधी कोल्हापूरला एक हॉल्ट घेतला. मग थेट कोकणातउतरलो. निवती - एक छोटी वाडी. वेंगुर्ल्या जवळ, कुडाळ शेजारी ही छोटीशी वस्ती. प्रामुख्याने कोळी लोकांची ! थोडे डोंगरावरती एक तुटका किल्लाही. अन खाली दुसरे समुद्र किनारे. अन येतानी थेट पुणे, ताम्हणी घाटातून.
तिथेले हे सारे फोटो.
हे कोल्हापूरच्या हॉटेल मधून सुर्योद्याचे टिपलेले काही फोटो
१.
आनंद व्यक्त करायचं सर्वात सहज आणि सुरेख साधन म्हणजे हसरा चेहरा... आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची स्माईल्स, हास्य आपण रोज बघत असतो.. ती फोटोन्मधून साठवून ठेवायला हा धागा!
"मला स्माईल्स कलेक्ट करायचा छंद आहे" असा काहीसा एक डायलॉग अनुशा दांडेकर तिच्या इंग्रजी मराठीत एका फिल्ममध्ये म्हणते. ( हे आपलं उगाच, पहिलं वाक्य लिहिताना आठवलं म्हणून...)
चला , आपणही हसरे चेहरे कलेक्ट करूयात :)
सृजनाच्या वाटा हा एक कायमस्वरुपी उपक्रम आहे ज्यात दर महिन्याला नवनविन विषयांतर्गत तुम्हाला तुमची कला सर्वांपुढे सादर करता येईल. मार्च-एप्रिल २०१५ साठी विषय होता/आहे - वसंत ऋतु.
मात्र यापुढे आपल्या या उपक्रमासाठी विषय आपण सगळ्यांनी मिळून शोधूयात. हा धागा त्यासाठीच आहे. तुम्हाला सुचतील ते विषय इथे सुचवा. विषयाला काहीही बंधन नाही. सुचवलेल्या विषयांतून जास्त अनुमोदन मिळालेला विषय दर महिन्याला निवडता येईल.
या उन्मेषाचे विविध आविष्कार एका व्यासपीठावर आणण्याचा एक अभिनव उपक्रम आम्ही 'मैत्रीण.कॉम' वरील सर्व मैत्रिणींसाठी घोषित करत आहोत - सृजनाच्या वाटा.
या उपक्रमांतर्गत दर महिन्यासाठी एक विषय (थीम) निवडण्यात येईल. त्या एक महिन्याच्या कालखंडात या विषयाच्या अनुषंगाने सदस्य मैत्रिणींनी आपापल्या कलाकृती इथे सादर करायच्या आहेत. या कलाकृती कोणत्याही स्वरुपातील आणि / किंवा माध्यमातील स्वनिर्मित कलाकृती असू शकतील.