सरत्या पावसात, काही डबकी साचलेली.
घनगर्द अरण्य मी चाचपडत आहे..
रंगीबेरंगी पक्षांची भरघोस विण.
दुधी आवाज, आकाशाच्या पार जाणारा.
एक झरा टणक कातळाला टोचा मारत आहे..
गुळगुळीत गोटे अंतर्बाह्य हलतात.
त्यांच्या मुलायम, दगडी त्वचेवरचा शहारा.
वाऱ्याचा एक मजबूत हेलकावा
आणि सूर्य शिवण उसवून ओघळतो,
लांबचलांब पसरलेल्या शेतांमध्ये.
आता शेकडो योजने दिसतील मला
माझ्या मिचमिच्या पापण्यांमधून..
उनाड वाऱ्याची हळूच कुजबुज,
"माहितीये? उजेडाची नशा माझ्यात असती,
तर मी अक्खा समुद्र भरला असता
या फुलत्या कमलिनीच्या पोटी..
वेड्या!
इतकं दिलदार आणि दिलफेक असू नये रे माणसाने!
हा वीकांत कविता वाचत घालवला. (शुम्पीच्या इरामुळे स्फूर्ती मिळाल्यामुळे :fadfad: ) शोधाशोध करताना जपानी कवयित्री सगावा चिका हिच्या abstract, modernist (btw ह्या कविता १९२०-३० च्या काळातील आहेत) कविता खूप आवडल्या. ही उमदी कवयित्री वयाच्या अवघ्या पंचविशीत कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडली. अवघ्या पाच सहा वर्षात लिहिलेल्या तिच्या कविता आहेत. एक- दोन कवितांचा अनुवाद करण्याचा मोह आवरला नाही. त्या कविता इथे देतेय.
काचपंख
माणसं हळूच प्रेम पाठवतात
काचेच्या पंखांमध्ये अलगद ठेवून
चौकातच सूर्य त्यांचा करून टाकतो चुरा.
खिडकीसमोर आभाळ उभं ठाकतं
काळवंडू लागतं खोटा श्वास थांबताना.
खर म्हणजे ही कविता नाही, पण काव्यात्मक लिखाण आहे. इथे तसा काही गट सापडला नाही म्हणून कवितेखालीच लिहिते आहे. लिखाण जुनच आहे, आज फेसबुक मेमरी मध्ये आलंय म्हणून इथे पण :fadfad:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा.
स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो देखणा कवडसा.
थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती.
माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं.
चला, इथे कवितांवरील झब्बूंची मैफल जमवुयात :)
कधी स्वतंत्र कविता टाकावी वाटली तर स्वतंत्र धागा काढूनही टाका आणि इथे लिंक द्या. किंवा फक्त इथेच टाकावी वाटली तरी तसही चालेल.
{अश्वथामा एक चिरंजिवी ! मृत्यूचे त्याला भय नव्हते. मात्र महाभारतातील एका भयंकर चुकीमुळे, त्याच्या कपाळावरचा जन्मजात दिव्य मणी उपसून काढला गेला. अन तिथे राहिली एक न सुकणारी जखम ! ही डोक्यावरची भळभळणारी जखम घेऊन हा चिरंजिवी अजूनही फिरतो आहे.
आपला समाज एक सनातन समाज - ज्याला आदि नाही, ज्याला अंत नाही ! एका अर्थाने चिरंजिवी ! आपल्याही कपाळावर एक दिव्य मणी आहे, संयमाचा !
काल एका मैत्रिणीला भेटलेले. तशी खूप ओळख मैत्री नव्हती. पण तरीही तिला माझ्याशी खूप मनातलं बोलावसं वाटलं. कितीतरी दबलेलं, खदखदणारं बाहेर पडलं. किती तरी समुद्र वाहून गेले.
काय अन कोणत्या शब्दात आधार देत गेले कोणजाणे. पण हळूहळू शांत झाली,यातच समाधान.निघताना तिच्या चेहऱ्यावरची नव्याने जगण्याची उर्मी दिसली, अन म्हणून परतले मी. पण मनातली हूरहूर संपत नव्हती.
आज सकाळी तिचा स्वत:हून फोन आला. खूप भरभरून बोलली, नवीन काही करण्याचा विचार, योजना मांडल्या. अन त्यातून हे मनातली अत्तरे उमटली.
सृजनाच्या वाटा हा एक कायमस्वरुपी उपक्रम आहे ज्यात दर महिन्याला नवनविन विषयांतर्गत तुम्हाला तुमची कला सर्वांपुढे सादर करता येईल. मार्च-एप्रिल २०१५ साठी विषय होता/आहे - वसंत ऋतु.
मात्र यापुढे आपल्या या उपक्रमासाठी विषय आपण सगळ्यांनी मिळून शोधूयात. हा धागा त्यासाठीच आहे. तुम्हाला सुचतील ते विषय इथे सुचवा. विषयाला काहीही बंधन नाही. सुचवलेल्या विषयांतून जास्त अनुमोदन मिळालेला विषय दर महिन्याला निवडता येईल.