(सांग सख्या रे ) -- विडंबन !

पेर्ना

सांग सख्या रे हे
असे काय व्हावे
डायट करुनीही
वेट गेन व्हावे!

जरी यंत्र बदलुन
उभी मी रहावे
विशाल आकडे
हाय दाखवावे!

वस्त्रे ही माझी
कशी घट्ट व्हावी
किती सैल करावे
मला ना कळावे 
सांग सख्या रे हे; 
असे काय व्हावे?

फुग्याने जसे या
फुगीर व्हावे
तसे मी फुलावे
पसरून जावे

अशी काय जादु?
असे काय व्हावे?
जंक टाळी तरी हे
आकार वाढावे
सांग सख्या रे हे; 
असे काय व्हावे?

क्लिनिकात दिवेकरांच्या
पाकीट हलके व्हावे
तू लॉरेल अन मी
तुझी हार्डी व्हावे

तुझे कुजक कटाक्ष
मी दुर्लक्षावे
सांग संख्या रे हे
असे काय व्हावे?

=========================================
तटी
१. विडंबन असा स्पेशल विभाग नसल्याने कविता विभागात पोस्ट केली आहे.

२. विडंबनाला कच्चा माल दिल्याबद्दल संबंधितांचे आभार . :P

Keywords: 

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle