माझा माझ्या मनाशी संवाद होत असताना अशाच सुचलेल्या चार ओळी
तुझ्याशी बोलले की मला मी अधिक आवडायला लागते
दैवाने खरंच सौंदर्य बहाल केलय हे पटायला लागते
तुझे हे असे प्रेम करणे हवेहवेसे वाटायला लागते
त्या प्रेमावर प्रेम करावेसे मलाही वाटू लागते
तुझ्याशी बोलताना, तुला मी दिसत असते आणि मलाही मीच दिसत असते
तू एक माध्यम आहेस, माझे स्वतःवरंच प्रेम करणे दिवसागणिक वाढते आहे
माझ्यासाठी तुझे अस्तित्व, माझ्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक भासते आहे.
तू जेव्हा श्रावण बनून आला,
पाचूचा सागर होता उसळला
तू बनून येता बहर पारिजातकाचा,
देहच झाला माझा, फाया अत्तराचा.
तू बनून येता माझा बसंत,
श्वासांनाही ना मिळे जरा उसंत.
तू शिशिर बनुनी आला,
झाले आयुष्यच पाला पाचोळा...
मौनच उरले जरी आता अंगणी,
देह अडकुन आहे, अजून मोहाच्या रिंगणी...
जेव्हा वयाची पंच्याहत्तरी येते —२
**************************
चक्क काहीतरी लिहावे वाटतय
म्हणजे मी म्हातारा झालोय?
अवघे पंच्चाहत्तरावेच तर सरतेय
किती ही कलकल?मीच गप्प बसतोय....
सूनेने उशीर झाला समजून दिला चहा
मुलाने हातातले वर्तमानपत्र ठेवलं समोर
सौ ने माझ्या कपाळाला लावला हात
तोंडाने बडबड,वैताग,जीवाला घोर....
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत...
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.
रुपाली..श्रद्धा.. आणि
उजेडात न आलेली सावजं किती तरी
आईवडिलांशी भांडून घर सोडलेल्या, पळून गेलेल्या किती तरी
इतक्या भाळल्या? कशाला भुलल्या?
जिवावर अशा कशा उदार झाल्या?
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.