कविता

लेक म्हणजे....

लेक म्हणजे शहाळ्यातली मलई,
लेक म्हणजे गुलाबी थंडीत पांघरलेली दुलई,

केसांचा गुंता... नाजूक पसारा...
लेक म्हणजे घामेजले ल्या मनावर प्रसन्न वारा.

लेक म्हणजे रात्री बेरात्री बिनधास्त फिरणे...
अन अचानक दिसलेल्या पाल/ झुरळाला भयानक घाबरणे.

स्वतः खूप काही गपचुप सहन करते,
पण दुसर्‍या वरच्या अन्यायाने चटकन गहिवरते.

लेक म्हणजे खडकाळ, भकास वाळवंटावर चांदण्याचा शिडकावा.
कधी प्रचंड ऊर्जा तर कधी सहज गोडवा.

लेक म्हणजे थरथरते रंगी बेरंगी फुल पाखरू...

गेले भर्र कन उडून माय म्हणे आता मी काय करु?

Keywords: 

कविता: 

सगळं काही वारा..

सरत्या पावसात, काही डबकी साचलेली.
घनगर्द अरण्य मी चाचपडत आहे..
रंगीबेरंगी पक्षांची भरघोस विण.
दुधी आवाज, आकाशाच्या पार जाणारा.
एक झरा टणक कातळाला टोचा मारत आहे..
गुळगुळीत गोटे अंतर्बाह्य हलतात.
त्यांच्या मुलायम, दगडी त्वचेवरचा शहारा.
वाऱ्याचा एक मजबूत हेलकावा
आणि सूर्य शिवण उसवून ओघळतो,
लांबचलांब पसरलेल्या शेतांमध्ये.
आता शेकडो योजने दिसतील मला
माझ्या मिचमिच्या पापण्यांमधून..
उनाड वाऱ्याची हळूच कुजबुज,
"माहितीये? उजेडाची नशा माझ्यात असती,
तर मी अक्खा समुद्र भरला असता
या फुलत्या कमलिनीच्या पोटी..
वेड्या!
इतकं दिलदार आणि दिलफेक असू नये रे माणसाने!

------

Keywords: 

कविता: 

इथपासून तिथपर्यंत

ती खिडकीतून बघते
वेलींच्या दोरखंडांनी जखडलेली झाडे
वाऱ्यावर हलायच्या प्रयत्नात

कुठेतरी उठून दिसतो
कोपऱ्यावरच्या नवश्या मारुतीसाठी
नवी घंटा बांधणारा सुटातला माणूस

पुढच्या एका वळणावर
भिकारणीचं पोर टाचा उंचावून पहातं
बास्केटमध्ये अलगद पडणारा बॉल

अंधारून येता येता
हेडफोन खुपसून पळणारी मुलगी
बघून दात विचकणारा एक बुलेटस्वार

चायनीज टपरीसमोर
मान टाकून सुस्त पडलेला कुत्रा
ताणत टम्म फुगलेलं शरीर

पायऱ्या चढून
वर पत्रे निसटलेली एक झोपडी
'येथे हावा भरून मिळेल'

आत फक्त गर्दी
धक्के देणारा आवाजाचा कोलाहल
मेंदू हलवणारी एखादी कळ

फुटपाथवर व्यायामाची यंत्रे

Keywords: 

कविता: 

चाहुल

खुपचं दिवसांनी इकडे येतीये.... खरं तर वेळच मिळत नव्हता. वेळ काढला की मिळतो.. पण आधी जॉब मध्ये खूप वेळ जायचा. आणि नंतर सेल मध्ये.. गडबडीत दिवस संपून जायचा..स्वतःसाठी सुधा वेळ मिळत नव्हता.... पण आज खूप दिवसांनी कविता सुचली.. मग काय इकडे सांगितल्याशिवाय राहवेना... आता आईकडे आहे ना..त्यामुळे वेळच वेळा आहे... आराम आहे.. आता येत जाईन इकडे regular....

या कवितेला मला खास अस काही शीर्षक सुचलं नाहीये..तर तुम्हीच सुचवा काहीतर.. मी आपलं तातपुरत नाव दिलं..

चाहूल
लागली नाजूक पावलांची चाहूल
आणि आपल्या सहजीवनी सुंदर आला बहर

कविता: 

नव मैत्रीण - उपक्रम

पुस्तकाची आवड दूरदेशी जपणारी आणि अतिशय उत्तम आणि सजग आई असलेली माझी नव मैत्रीण दिपाली हिने मला मैत्रीण वर स्वतःच लिहिलेलं काहीतरी पोस्ट कर असं चॅलेंज दिली नवरात्री औचित्य साधून लेकीवरची कविता टाकते ... सध्या लिहिते आहे पण प्रकाशित करत नाहीये पण आता सुरु करेन ... थँक यु दीपाली ...

IMG_4488.JPG

कविता: 

जय गजानन जय गजानन

जय गजानन जय गजानन

घरोघरी झाले आगमन
जय गजानन जय गजानन
लंब उदर, शुंडा वदनी
मूषक शोभे वाहनी
आवडे बहु मोदक
सारणात गूळ-खोबरे एक
वाहा एकवीस दुर्वा
संकटांनो दूर व्हा
गंध पुष्प रक्तवर्ण
सुखे हलवी गजकर्ण
दिसे गोंडस कैक रुपात
वसे मग मन्मनात
करता आरती मंत्रपुष्पांजली
आशीर्वादे भरली अंजुली
विसरुन आपपर भाव
दशदिन चाले उत्सव
पुन्हा ये लवकरी हीच आण
जय गजानन जय गजानन
विजया केळकर_______

कविता: 

अंतरीच्या गूढगर्भी

निःशब्दतेच्या गूढगर्भी
अर्था-अनर्थांची वादळे
अर्थाच्या हिमनदीखाली
वाहणारे
घाव मनीचे कोवळे-सावळे

जुनाट जखमा, वाळलेले अश्रू
चोळामोळा झालेलं
चुरगळलेलं मन
आणि
कोरड्या एकाकी वाटा
पाहणारे निष्प्राण चक्षू

असह्य एकटेपणानी
चहुबाजूंनी उठवलेली वावटळ
आणि त्या अंधारानी
फेर धरून मांडलेली रास
आणि
कुडीचं वस्त्र फेडून
बाहेर येण्यासाठी
तगमग करणारं
आपल्या आतलं
काहीतरी

नकोसेच वाटणारे
निरर्थक उन्हाळे-पावसाळे
बाहेरचे आणि आतलेही .
नकोश्या संवेदना
नकोशी नजर , आवाज
स्पर्श आणि अस्तित्व .
या सगळ्यांची ,
पंचेंद्रियांच्या काड्यांची
मोळी बांधून फेकून देणारी

कविता: 

शिक्षकदिनाच कारण

शिक्षकदिनाच कारण

अक्षर ओळख करून झाली
वाचा आता धडे
रोज रोज म्हणून घेतले
गणितातले पाढे

सुर्याच्या उष्णतेमुळे होते
पाण्याची वाफ
बाष्पीभवन घनिभवन पर्जन्य
घोटून झाले तर सर्व खोड्या माफ

मराठीतल्या कविताना
लावून सुंदर चाल
संदर्भासहित स्पष्टीकरण करत
संपवला सर्व तास

असे शिक्षक घडवतात
नव्या दमाची पिढी
संस्कार करत वाहून घेतात
राहातात साधीसुधी

शिक्षक म्हणून नेहमीच वाटतो
आम्हा तुमचा आदर
भाव पोहचवायचाय आजच
साधून शिक्षकदिनाच कारण

शेफाली जोशी (तृप्ती गोडबोले )

कविता: 

क्रृष्णाष्टमी

कृष्णाष्टमी------
कृष्ण कृष्ण गाता
मन तेथून न हालेना

दही घुसळत असता
नवनीत काही निघेना

कृष्णकृष्ण आठवता
लोणी वरतीआलेना

दही-लोणी शिंकाळ्यात ठेवता
मनीची धाकधुक जाईना

: दही हंडी काढता
तोल सावरता येईना

कान्हा कान्हा पुकारता
कोठून आला कळेना

खांद्या-खांद्यावर चढता
कोणाचेच लक्ष जाईना

सांडले दही थाप मारता
मनी आनंद माईना

गोविंदा आला रे आता
पण पेंद्यास नाचता जमेना

त्याच्या भोवती फेर धरता
गोकुळ हसले सारे गुंगले ना

विजया केळकर_______

कविता: 

ती उमेद

'ती' उमेद

हसाव का रडाव ?
मला काहीच नव्हत कळत
पावसाच्या धारेत
मन होत नुसत वाहत !

कळलच नाही कधी
सुटला मनावरचा बांध
धरण फुटाव तसा
वाहिला तिरावरचा गाव

आधाराला फांदीच्या
मुठ पकडली घट्ट
पुढच्या प्रवासात आता
मी एकटीच नव्हते फक्त

इवल्याश्या कळीचा
नाजूकसा आवाज
आपण 'दोघी' सोबतीन
करू सुंदर जीवनप्रवास

निळ्या मोकळ्या आभाळात
उंचच उंच उडाव
कुठ काही चुकताना
'ते' नेमक कळाव

शेफाली जोशी (तृप्ती गोडबोले )

कविता: 

पाने

Subscribe to कविता