कविता

भोज्या

खरच, तिथे काही नव्हतच...

घाबरण्यासारखं किंवा उदात्त वगैरे,
लखलखित प्रकाश किंवा
गुढगंभीर अंधार...
असं नव्हतंच काही ...

एक मंद, शांत, दिलासा देणारा
निळसर प्रकाश, एक अनामिक शांतता
आणि एक अनाकलनीय निर्विकारता...
आणि शांत मंद
दिलासादायक
निळा प्रकाश

एका क्षणी, खोल गाभाऱ्यातून उमटावेत
तसे डॉक्टरांचे शब्द
मनावर हलकेसे उमटत गेले...
श्वास घे, बेटा, श्वास घे...
मोठा श्वास घे बयो...
हळुहळू घंटेचे नाद उमटत रहावेत
तसे मनावर निनादत राहिले...

मी मजेत, निवांत
हळूच हसूऩ म्हटलं सुद्धा,
घेतेय की श्वास,
नका काळजी करू...
अन मग डॉक्टरांचे ;
डळमळीत आत्मविश्वासातून
उमटलेले शब्द

कविता: 

एका सांजेच्या पारीला

एका सांजेच्या पारीला
मन कोरे निराकार
जणु मनाने धरला
निळ्या नभाचा आकार..

आला सरसर वारा
सारी मळभ नभाचे
मनअंगणी हसले
जणु ठसे मेघियाचे

गाणे ओल्या पावसाचे
थेंबाथेंबाने रचले
मन पावसाचे जणु
को-या मातीत रुजले

नभी पाऊस भरता
भरे अमृताचा घट
गाजे सावळा सोहळा
स्वर गंध अनवट

उभे रान थरारले
अन शहारली पाती
नवलाईने फुलली
अंतरीची नवी नाती
सरे सांज सुरमई
रात चंदेरी निजली
ओल्या पहाटगंधात
नवी किरणे सजली..
नवी किरणे सजली..

Keywords: 

कविता: 

रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना....

रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना

विसरते मी दिवसभराचे सर्व कष्ट

तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात

पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज

सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात

जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या आईचाही तिरस्कार करु शकतोस

तिथे दुसर्‍या बायकांची काय बिशाद

तरीही तुझ्याकडुन सन्मानाची वेडी आशा केलीच मी

आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु

तरीही जा तुला माफ केले

कारण एक आई दुसर्‍या आईच्या कुसेचा अवमान करुच शकत नाही..

कविता: 

अगणित अश्वत्थामे

{अश्वथामा एक चिरंजिवी ! मृत्यूचे त्याला भय नव्हते. मात्र महाभारतातील एका भयंकर चुकीमुळे, त्याच्या कपाळावरचा जन्मजात दिव्य मणी उपसून काढला गेला. अन तिथे राहिली एक न सुकणारी जखम ! ही डोक्यावरची भळभळणारी जखम घेऊन हा चिरंजिवी अजूनही फिरतो आहे.
आपला समाज एक सनातन समाज - ज्याला आदि नाही, ज्याला अंत नाही ! एका अर्थाने चिरंजिवी ! आपल्याही कपाळावर एक दिव्य मणी आहे, संयमाचा !

Keywords: 

कविता: 

अगदी तेव्हाच...

(काल एक आचरट कविता टाकली, म्हणून आज जरा सिरियस कविता )

संपले पुस्तक होते राहिले, शेवटचे एक पान
पडाव होता दूर थोडाच, तुला त्याची आस.

झिजलेल्या काळ्या धाग्याची, गळ्यामधे गुंफण
झाली होती भाळावरली, चिरी फिकी पण.

पायाखाली रिती थोडी, अजून होती वाट
पायामधे शिल्लक होते, अजून थोडे त्राण.

फांदीवर तगून राहिलेली, पिवळी एक शेंग
आलाच होता पडायला, अळूवरचा थेंब.

चोचीमधे होता उरला, फक्त शेवटचाच घास
होतच आली होती पूर्ण, फिनिक्स पक्षाची राख.

गळ्यात होते थरथरते, सुंदर एक गान

कविता: 

मैत्री कशी असावी ....

(माझी एक जुनी मजेशीर :fadfad: कविता)

पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी
दुधाहूनही स्निग्ध ; जिभेला मऊसूत करणारी
दह्याहूनही कवडी ; जिभेवर टिकून राहणारी
तुपाहूनही रवाळ ; जिभेवर रेंगाळत राहणारी
श्रीखंडाहूनही निघोट ; जिभेवर मुरत जाणारी
चिवड्याहूनही कुरकुरीत ; जिभेला सोकवायला लावणारी
चकलीहूनही खुसखुशीत ; जिभेला अतृप्त करणारी
पिठीसाखरेहूनही गोड ; जिभेवर विरघळत जाणारी
अन मधाहूनही घट्ट ; जिभभर पसरत जाणारी
मैत्री अशी हवी ! :heehee:

मोरासारखी नाचणारी ; निखळ आनंद देणारी
कोकीळेच्या स्वरात गाणारी ; सुखसंवाद करणारी
प्राजक्तासम नाजूक ; हळूवार सुगंधी पखरण

Keywords: 

कविता: 

मनाची अत्तरे

काल एका मैत्रिणीला भेटलेले. तशी खूप ओळख मैत्री नव्हती. पण तरीही तिला माझ्याशी खूप मनातलं बोलावसं वाटलं. कितीतरी दबलेलं, खदखदणारं बाहेर पडलं. किती तरी समुद्र वाहून गेले.
काय अन कोणत्या शब्दात आधार देत गेले कोणजाणे. पण हळूहळू शांत झाली,यातच समाधान.निघताना तिच्या चेहऱ्यावरची नव्याने जगण्याची उर्मी दिसली, अन म्हणून परतले मी. पण मनातली हूरहूर संपत नव्हती.

आज सकाळी तिचा स्वत:हून फोन आला. खूप भरभरून बोलली, नवीन काही करण्याचा विचार, योजना मांडल्या. अन त्यातून हे मनातली अत्तरे उमटली.

Keywords: 

कविता: 

पाने

Subscribe to कविता
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle