अक्षय तृतीया
माझ्या साजणा,माझी हौस कि हो पुरावा
माळा कि माझ्या केसात मोगऱ्याचा गजरा
धवल पुष्पे,गंध मादक हा बरवा
धरा जीवलगा,हात हातात कि धरा
वीणेची तार छेडता, वेड लागले जीवा
वीजू चमकता जैसे नाचे मन मयुरा
वैभव विपुल आता घर कि सजवा
वैशाख तृतीया आज, सख्या येतील घरा
द्याया शुभेच्छा, आंबे-डाळ, पन्हे बनवा
द्या हरभऱ्याची ओटी, येऊ द्या थंडगार वारा
सख्या म्हणती रहावा जीवनी गोडवा
लाजती 'नाव'घेता,दिन झाला साजरा
गौरी निघाली आपुल्या गावा
या शुभ दिनी हसत मुखे पाठवण करा....