आहा!! काय सुंदर ओळ
कसं ग बाई गोड ते!
ओहो ओहो ,
अहो थांबा थांबाच
अं?
काय झाल?
च्च!!! मीटर बघा की
असं काय!! हो की,
निट उमटू तरी दे मला मनात तुझ्या
मला काय म्हणायचं आहे ते तरी ऐक ना, प्लीज
छे छे अजिबातच नाही
म्हणजे नाहीच
हे बघ मला वृत्त सांभाळायला हवं आहे.
तू नकोस
उपटली ओळ
कम्प्लीट बॅकस्पेस
विंडोच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत.
...
तर मी काय म्हणत होते आम्ही ना थेट स्क्रीनवरच लिहितो आजकाल ,
हे स्क्रीनवर लिहिण फार सोप्प असतंय बघा, कागदावर कशी खाडाखोड स्पष्ट दिसते कागद नष्ट करेपर्यंत.
हातातल्या पुस्तकातली कथा रंगत चाललेली असताना लक्षात येतं ,
अर्ध्याच्यावर पुस्तक वाचून झालंय...
अरेच्चा शेवट जवळ आला की कथेचा.
च्च!! एवढ्यात नको ना शेवट व्हायला,
अजून जरा जास्ती असतं तर आवडेल वाचायला.
केवढी रंगलीये कथा!
त्यातली पात्र पण अगदी आपल्या मनासारखी वागतायत.
पुढचं पान उलटल..
हे काय अचानक वेगळ्च वळण घेतलं कथेनी?
हे अस नको ना व्हायला.
एवढी का गुंतत चालल्ये या सगळ्यामध्ये?
एक क्षुल्लक कथाच
ती काय वाचायची आणि सोडून द्यायची
पण असलं काहीतरीच का व्हायला लागलय?
पुस्तकात बुक-मार्क घालून ठेऊनच देऊया झालं...
कथेचा शेवट नकोच व्हायला.
खर म्हणजे ही कविता नाही, पण काव्यात्मक लिखाण आहे. इथे तसा काही गट सापडला नाही म्हणून कवितेखालीच लिहिते आहे. लिखाण जुनच आहे, आज फेसबुक मेमरी मध्ये आलंय म्हणून इथे पण :fadfad:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा.
स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो देखणा कवडसा.
थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती.
माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं.
परवा कधीतरी चुकून तो कुर्ता ड्रायक्लीनला दिला गेला
सिल्क चा सुंदर गडद गुलाबी रंगाचा
आवडत्या स्टोर मधून घेतलेला
तो कुर्ता आवडायचा भयंकरच
जपायचे पण खूप त्याला
खास प्रसंगालाच वापरायचे
नंतर व्यवस्थित काढून जरास ऊन दाखवून
पुन्हा इस्त्री बिस्त्री करून जागेवर ठेवला जायचा
कसा दिला गेला की या रोजच्या कपड्यामध्ये ?
परत आला धोब्याकडून तर,
त्याच्या त्या सुंदर गडद गुलाबी रंगाची शेड बदलेली,
त्यावर ऑफव्हाईट दोर्यांनी केलेलं भरतकाम,
त्याचाही रंग बदलला आहे वाईट नाही दिसत आहे खर तर;
स्वप्नांना वगळून रात्र सोसली आहेस कधी?
निळाई गिळून टाकतो काळोख
हट्टाने मग मनातला एकेक तुकडा जोड़ायचा
ठिगळाचा pattern स्वप्न म्हणून खपेल का?
काळोखाला भेदणारी निळाई सापडेल का?
पहात रहायच मिटल्या डोळ्यानी
जाग येतेच कधितरी
पण काळोख असतोच वर खाली
डोळे फाडून बघत रहायच
टक्क!
ठिगळाचा pattern बनवत रहायच
दिवस उजाडे पर्यन्त
स्वप्नांना वगळून दिवस मात्र सोसायचा
हसत हसत ढकलत रहायचा
मनात एकेक तुकडा साठवायचा
एका नवीन रात्री साठी
एका नव्या निळाईसाठी
||वळण||
हां इथेच असायला हवं
जरा पुढे जावून बघुया
अरे हेच की ते वळण
ओलांडल की सापडेलच!
दिसेल तुला
तुझं नी माझं
अरे काय म्हणून काय विचारतोएस?
काहिही सापडेल
काहिही दिसेल
काहिही असेल
पण जे असेल ते फक्त
तुझं नी माझं असेल
चित्र दिसेल कदाचित्
तुझ्या माझ्या मिठिच्या
गहिऱ्या रंगात रंगलेलं!
किंवा गाणं ऐकू येईल
तुझ्या माझ्या विरहाच्या
आर्त सुरात भिजलेलं!
आपल घरही असेल तिथेच
आठवणिंची एक एक वीट
ठेवून रचलेलं.
पाऊस भेटेल तिथेच
धो धो कोसळणारा
तुला मला अज्जीब्बात न भिजवणारा
पण आडोशाला एकमेकांजवळ ढकलणारा
तू ये तर खरं
शोध ना जरा
मी फिरतीये तिथेच गोल गोल
आपली भांडणं