आहा!! काय सुंदर ओळ
कसं ग बाई गोड ते!
ओहो ओहो ,
अहो थांबा थांबाच
अं?
काय झाल?
च्च!!! मीटर बघा की
असं काय!! हो की,
निट उमटू तरी दे मला मनात तुझ्या
मला काय म्हणायचं आहे ते तरी ऐक ना, प्लीज
छे छे अजिबातच नाही
म्हणजे नाहीच
हे बघ मला वृत्त सांभाळायला हवं आहे.
तू नकोस
उपटली ओळ
कम्प्लीट बॅकस्पेस
विंडोच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत.
...
तर मी काय म्हणत होते आम्ही ना थेट स्क्रीनवरच लिहितो आजकाल ,
हे स्क्रीनवर लिहिण फार सोप्प असतंय बघा, कागदावर कशी खाडाखोड स्पष्ट दिसते कागद नष्ट करेपर्यंत.
पण स्क्रीनच तसं अजिबातच नाही. अगदी स्वच्छ कागदावर लिहिलेली कविता ही कविता होण्याआधी कोण होती? कशी होती याचा मागमूसही उरत नाही.
आम्ही ना थेट स्क्रीनवरच लिहितो बघा हल्ली.
काय ते उगाच कागद सांभाळा, खोडा-खोडी सांभाळा
कागद खोडा-खोड
स्क्रीन
काय म्हणत होते मी
अं?
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle