कनुप्रिया
पावा बोले राधा राधा
राधा रागे भरी हरि
कां धरी अधरी पावा
मी अधीर तू पावावा
बनवारीची बासरी
रागे भरी तू सांगावे
प्रिया कां होई बावरी
मी अधीर तिने यावे
बन्सी राधिका रुसले
डोळे कदंब डहाळी
मुरलीधर हसले
डोली करती कागाळी
वेणूधारीभय दावी
ध्यानमग्न मुद्रा धरी
सखा निद्रेतून उठवी
उठि उठि बा मुरारी
कनुप्रिया पुलकित
शोभिवंत मोरपीस
मनमंदिरी अंकित
छबी शामल राजस
मनमोहना वाजव
कर्णमधुर संगीत
देहभान न रहावं
रंगू या रासलिलेत
विजया केळकर _____