मन

 कधी अचानक दिवस उगवतो 
खूपच वेगळा अगदी वेगळा 
त्याला रोजची घाई नसते 
जाण्याची गती नसते
            रेंगाळणाऱ्या वार्यासारख्या
            तो  थांबून थांबून चालतो 
            जुन्या  पुराण्या आठवणीना
            तो आठवत आठवत निघतो
सुखाबरोबर दुखाचीही गोष्ट निघते
मनातील कोपर्‍यामधील आठवणी उजळत
मधेच एखादी अनामिक हुरहूर दाटते 
आणि अशातच संध्याकाळ होते
           मन पुन्हा एकदा विचलत होते
          पूर्णपणे घुसळून निघते
          मग एखादी अशा मनामध्ये जागते
         उरलेल्या आयुष्याला पुन्हा दिशा देते

Keywords: 

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle