माझी सगळ्यात चांगली व्हर्जन : मीच ती एकटीच राहते म्हणे.... आणि तिचे रिलेशनशिप स्टेटस पण काही कळत नाही बुवा.... कधी गळापडू मैत्री करत नाही अन कधी विनम्र पणा सोडत नाही... छ्या.. ह्या स्वप्नाळू बाईला साच्यात बसवायचं तरी कसं ?! मी कशी दिसते अन कोणावर प्रेम करते या वरून मला ठोकुन ठाकून साच्यात बसवायचे तुमचे प्रयत्न आहेत व्यर्थ. मी फक्त मी म्हणून जगते आहे समृद्ध, सुखी, स्वतंत्र, समर्थ. तुमचे तुच्छ पूर्वग्रह आणि सामाजिक बंधने तोडून विहरते आहे मी मोकळ्या निळ्या अवकाशात कसलं ग्लास सीलिन्ग म्हणताय?! माझं ज्ञान कमी पडत होतं ते शिकून केलीये मी त्यावर मात. Keywords: Being My Bestकविता: कविता Read more about माझी सगळ्यात चांगली व्हर्जन : मीचLog in or register to post comments