हातातल्या पुस्तकातली कथा रंगत चाललेली असताना लक्षात येतं ,
अर्ध्याच्यावर पुस्तक वाचून झालंय...
अरेच्चा शेवट जवळ आला की कथेचा.
च्च!! एवढ्यात नको ना शेवट व्हायला,
अजून जरा जास्ती असतं तर आवडेल वाचायला.
केवढी रंगलीये कथा!
त्यातली पात्र पण अगदी आपल्या मनासारखी वागतायत.
पुढचं पान उलटल..
हे काय अचानक वेगळ्च वळण घेतलं कथेनी?
हे अस नको ना व्हायला.
एवढी का गुंतत चालल्ये या सगळ्यामध्ये?
एक क्षुल्लक कथाच
ती काय वाचायची आणि सोडून द्यायची
पण असलं काहीतरीच का व्हायला लागलय?
पुस्तकात बुक-मार्क घालून ठेऊनच देऊया झालं...
कथेचा शेवट नकोच व्हायला.
नाहीतर लहान असताना परिच्या राज्याची स्वप्न पडावीत म्हणून करायचे तस पुस्तक पालथ घालून गादीखालीच ठेवू या का ?
का देऊनच टाकू कोणालातरी.?
"आपण नाहीच वाचला म्हणजे नाही झाला शेवट हाय काय नाय काय."
पुस्तकात बुक-मार्क घालून पुस्तक कपाटात पार तळाशी घालून ठेवलं,
आता नको तो शेवट वाचायची गरज नाही. होतं तसंच चित्र डोळ्यांपुढे कायम राहिल.
राणी, असा शेवट नाकारून कथानकं बदलतात का ?
"त्या" लेखकानी कधीच केलाय शेवट या कथेचा...
तू वाचलास तरी आणि नाही तरी...
...