चला, इथे कवितांवरील झब्बूंची मैफल जमवुयात :)
कधी स्वतंत्र कविता टाकावी वाटली तर स्वतंत्र धागा काढूनही टाका आणि इथे लिंक द्या. किंवा फक्त इथेच टाकावी वाटली तरी तसही चालेल.
अस काय होत तुझ्या माझ्यात?
कधी कोणता आव नाही
कधी ओढा ताण नाही
कसं अलगद जपलेलं
कातर हळवं नितळ स्वच्छ नातं.
इतक नकळत जपलेलं की
काय जपतोय हे ही न कळावं?
इतक घट्ट सामावलेलं
की तुझं दूर असणंही न जाणवावं!
आणि मग झालीच आपली भेट
तू होतासच माझ्यात
अन् मी ही तुझ्यात
न भेटता न बोलता सामावलेलं
अस्तीत्व आपलं एकमेकांत
ती आपली भेट
देऊन गेली भेट
तुझी मला नि माझी तुला!