मागू तुज प्रित कशी
अचपळ मन माझे
हृद्यातील वीज वेडी
उत्सुक पडण्या परि
पाहू कसे रुप तुझे
दिपले नयन माझे
कोसळे वर्षा अवेळी
अवाक स्तब्ध त्यात मी
चंचल नजर तुझी
स्थिर राही क्षणभरी
नाहतो नखशिखांत
मंत्रमुग्ध भ्रांतचित्त
हासती गुलाब गाली
आवाहने देती किती
हलकेच जाता पुढति
जाग नयनात येई
पाहतो जागेपणी मी
स्वप्ने तुझी भारलेली
प्रित वेडी हृद्यातली
परि येई ना ओठी
( कविन, घे बाई :winking: )