पहाट
प्रभाती जागुनी झाडावरती
गोड किलबिल पक्षी करती
झाडामागे रवी जागला
मोदभरे संगती सकला
नभी दिसला चंद्र थकलेला
निरोप देण्या गेला शुक्र तारा
उरवी जेथे भेटे आकाशाला
उखा आणी तेथेच दिनकरा
भानू लाल गोल-मटोल झाला
उरुभागी मातेच्या पहुडला
लाली गाली,सर्वांगी चढली नीरी
व तरुशिरी उष्णीश सोनेरी
शीतल गंधित पावन वाहे
वार्ताहार तो उत्तम,वदे
संगे भूपाळी,ईश्वरा वंदूनी
संगे,सुप्त जीव जागे करुनी
प्रभात समयी आनंद दाटे
चला त्वरे दोही करे त्या लुटाया
नित्य कर्म करता हौस वाटे
जाण वर्म उठोनिया पहाटे या
विजया केळकर _____