'ती' उमेद
हसाव का रडाव ?
मला काहीच नव्हत कळत
पावसाच्या धारेत
मन होत नुसत वाहत !
कळलच नाही कधी
सुटला मनावरचा बांध
धरण फुटाव तसा
वाहिला तिरावरचा गाव
आधाराला फांदीच्या
मुठ पकडली घट्ट
पुढच्या प्रवासात आता
मी एकटीच नव्हते फक्त
इवल्याश्या कळीचा
नाजूकसा आवाज
आपण 'दोघी' सोबतीन
करू सुंदर जीवनप्रवास
निळ्या मोकळ्या आभाळात
उंचच उंच उडाव
कुठ काही चुकताना
'ते' नेमक कळाव
शेफाली जोशी (तृप्ती गोडबोले )