इथपासून तिथपर्यंत ती खिडकीतून बघते वेलींच्या दोरखंडांनी जखडलेली झाडे वाऱ्यावर हलायच्या प्रयत्नात कुठेतरी उठून दिसतो कोपऱ्यावरच्या नवश्या मारुतीसाठी नवी घंटा बांधणारा सुटातला माणूस पुढच्या एका वळणावर भिकारणीचं पोर टाचा उंचावून पहातं बास्केटमध्ये अलगद पडणारा बॉल अंधारून येता येता हेडफोन खुपसून पळणारी मुलगी बघून दात विचकणारा एक बुलेटस्वार चायनीज टपरीसमोर मान टाकून सुस्त पडलेला कुत्रा ताणत टम्म फुगलेलं शरीर पायऱ्या चढून वर पत्रे निसटलेली एक झोपडी 'येथे हावा भरून मिळेल' आत फक्त गर्दी धक्के देणारा आवाजाचा कोलाहल मेंदू हलवणारी एखादी कळ फुटपाथवर व्यायामाची यंत्रे Keywords: प्रवासनिरीक्षणेसंध्याकाळकविता: कविता Read more about इथपासून तिथपर्यंतLog in or register to post comments