लेक म्हणजे.... लेक म्हणजे शहाळ्यातली मलई, लेक म्हणजे गुलाबी थंडीत पांघरलेली दुलई, केसांचा गुंता... नाजूक पसारा... लेक म्हणजे घामेजले ल्या मनावर प्रसन्न वारा. लेक म्हणजे रात्री बेरात्री बिनधास्त फिरणे... अन अचानक दिसलेल्या पाल/ झुरळाला भयानक घाबरणे. स्वतः खूप काही गपचुप सहन करते, पण दुसर्या वरच्या अन्यायाने चटकन गहिवरते. लेक म्हणजे खडकाळ, भकास वाळवंटावर चांदण्याचा शिडकावा. कधी प्रचंड ऊर्जा तर कधी सहज गोडवा. लेक म्हणजे थरथरते रंगी बेरंगी फुल पाखरू... गेले भर्र कन उडून माय म्हणे आता मी काय करु? Keywords: daughterschildrenकविता: कविता Read more about लेक म्हणजे....Log in or register to post comments