वारी निळ्या जांभळ्या आभाळी, घनगर्द सावळ्या मेघापरी उभा आहे कधीचा तो, आपल्याचसाठी विटेवरी सावळी त्याची माया, रूपही सावळे - गोजिरे शोभे कपाळी टिळा अन गळा तुळशीचे ते तुरे शांत शांत तो - उमजून आपल्या मनातील कोलाहल बघता रूप चित्ती, विसरते मना - मनातील चलबिचल क्षण एक जाता, दिसे तो ठायीठायी जळी-स्थळी-काष्ठी अन पाषाणी, नाद - स्वर झंकारले कानी तन - मन अवघे झाले वारी ! Keywords: कविता चित्रकविता: कविता Read more about वारी Log in or register to post comments