माझा माझ्या मनाशी संवाद होत असताना अशाच सुचलेल्या चार ओळी
तुझ्याशी बोलले की मला मी अधिक आवडायला लागते
दैवाने खरंच सौंदर्य बहाल केलय हे पटायला लागते
तुझे हे असे प्रेम करणे हवेहवेसे वाटायला लागते
त्या प्रेमावर प्रेम करावेसे मलाही वाटू लागते
तुझ्याशी बोलताना, तुला मी दिसत असते आणि मलाही मीच दिसत असते
तू एक माध्यम आहेस, माझे स्वतःवरंच प्रेम करणे दिवसागणिक वाढते आहे
माझ्यासाठी तुझे अस्तित्व, माझ्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक भासते आहे.