जेव्हा वयाची पंचाहत्तरी येते

गतआयुष्याकडे वळून बघते
जेव्हा वयाची पंचाहत्तरी येते

पुसट झालेले बालपण स्यष्ट दिसते
टकमका मणी ओंजळीतले पहाते
रिबिनीची फुले उडवत धावतच सरते ||गत ....

नकळत अल्लडपणा लाजणे शिकते
महाविद्यालयीन तरुणी यशा गाठते
स्वमत मांडायाचे कसब शिकते || गत.....

पण..परतु विना सुखी संसार थाटते
बाई,बाई...भाग्यास हसरेच मुख दावते
नमते घेत तेही मग हसतच प्रत्युत्तरते || गत...

आज एक एक सखी आठवते
जुन्या मैत्रीशी तासन् तास गप्पा करते
आनंदिता नव्या मैत्री गटात समरसते ||गत...

उंच जाणार्‍या झोक्याची गती मंदावते
आठवणींच्या झोक्याची गती वाढते
विजया मैत्रिणीस कविता भेट करते ||गत....

विजया केळकर______
नागपूर
२/८/२०२३

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle