अंगारिका
असते विशेषताप्राप्त चतुर्थी
अंगारिका तिला म्हणती
आर्तस्वरे गाती धाव-पाव रे
गणेशा,गजानना,गणपती
विविध रुपात शोभसी
भालचंद्रा,गजवक्त्रा,वक्रतुंडा
लालफुलांची शाल पांघरसी
प्रिय दुर्वांकुरे सजली शुंडा
ॐ कारे आळवती प्रथमेशा
मधुर गायने वादने तुष्टसी
विध्नहर्ता तू संकटनाशका
शरणागतांवर कधी ना रुष्टसी
लंबकर्णा,एकदंता,विद्यादाता
विघ्नराजेंद्रा संकटासी दूर करा
गणाधीशा पंचारती ओवाळली
आता मोदक खावेत लंबोदरा
सामाराधने व्हावी व्रत सांगता
कृपाळूवा सांभाळी बालका
सद्बुद्धी मागतो तुजपाशी
सदैव हात जोडूनी गणनायका
विजया केळकर_______
नागपूर