द्यावा या फुलांनी सुगंध
सुगंध माझ्या शब्दांना
जोडत नवा बंध मनामना
गोडवा जावा चहुदिशांना
नकोत रुतणारे काटे
शूल हृदया रक्ताळणारा
स्नेहिल मृदु प्रवाह
पाझरावा झुळझुळणारा
श्राव्य कोमल स्वर ऐसे
मिळावी तृप्तता कानांना
मिटती डोळे नकळत
ओलावा ना कळे पापण्यांना
शब्द-अर्थ एक भाव-बंध
असे दक्ष लक्ष्यपूर्तीसाठी
सक्षम,सशक्त रक्षा-बंध
सांगे मुक्ता-ज्ञाना आम्हांसाठी