छान छान लॅंडस्केप्स बघायला मला आधीपासूनच आवडायचं. कॅालेजमध्ये असताना मला परदेशातल्या चित्रांचं एक कॅलेंडर मिळालं होतं. त्यातले फोटोज मला इतके आवडायचे की वर्ष संपल्यावर मी भिंतीवर लावायला त्या कॅलेंडरची एक फ्रेम केली. दर थोड्या दिवसांनी त्या फ्रेममधली चित्रं आम्ही बदलायचो.
आज २ जून उजाडला. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. टेंटची excitement संपून गादीची आठवण यायला लागली होती. पण अजुन धीर धरायला हवा होता. कारण आजचा ट्रेकिंगचा शेवटचा दिवस असला तरी longest distance कव्हर करायचं होतं. जवळपास १९ किमी.
हिमालय - पिंडारी - खाती ते द्वाली
आज चौथा दिवस, आम्ही जास्तच उत्साहात होतो करण आज फुकरिया अर्थात बेस कॅम्पला पोचणार होतो. साधारण पाचच किमी चा रस्ता आणि जायला साधारण ३-३:३० तास लागणार होते. गरम चहा आणि नाश्ता करून आम्ही फुकरियाच्या दिशेने निघालो. आजचा दिवस आमच्या ट्रेकमधील सर्वात नयनरम्य भागांपैकी एक होता.
२०२१ मधे आयुष्यातल्या पहिल्या हिमालय ट्रेक साठी पैसे भरले पण करोना कृपेने तो पुढे ढकलावा लागला. या वर्षी सगळं मार्गी लागलं आणि २८ मे ते ३ जुन पिंडारी ग्लेशिअर ट्रेक नक्की झाला. पहिल्याचं नाविन्य असल्याने उत्सहात खरेदीही भरपूर झाली. decathlon चा एक दिवसचा turnover वाढवल्यावर जरा बरं वाटलं.
मामीचा 'देश-परदेशातील प्रवास, भटकंती - प्रश्न, माहिती, जनरल चर्चा, शंका' धागा छान आहे, आणि विविध प्रश्न, अनुभव, सुचना यांचा तिथे चांगला संग्रह जमा होत आहे. पण प्रवास म्हणजे फक्त धमाल, मजा, छान अनुभवच नाही, तर कधी कधी वेंधळेपणा, डोकेदुखी, फजितीचे अनुभवही देऊन जातो. हा वेगळा अनुभव कधी आपल्याला काही शिकवूनही जातो. तर हा धागा अशाच अनुभवांची चर्चा करण्याकरता...
शीर्षक वाचूनही इथे आलेल्या शूर मुलींचा मी जाहीर सत्कार करेन म्हणते ... शालेय जीवनात ज्याने अंत बघितला पण लिहून संपला नाही असा प्रश्न :वैताग: पण घाबरू नका इथे फक्त तुम्हाला टिप्स लिहायच्या आहेत . आपण एखादया ठिकाणी फिरायला जात असू तर तिथे करायचं शॉपिंग ,फिरायची ठिकाणं, फूड, डूज डोन्ट साठी इथे मदत मागूया.
सुरवात मी करते
Hongkong डिजनी लॅन्ड फिरायला जातोय ,5 दिवसाची ट्रिप असणार आहे त्यातले 2 दिवस डिजनी मध्ये असू , 1 दिवस ओशन पार्क .
मी व्हेज असल्याने सोबत ठेपले ठेवायचा सल्ला मिळाला आहे . माझी पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे, प्लिज हेल्प
केशवराज मंदिर. गाव- आसूद, तालुका- दापोली, जि. रत्नागिरी. हे गाव दापोलीकडून आंजर्ले गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे. खाली गाडी पार्क करून मिनी ट्रेक करून वर टेकडीवर देऊळ आहे. एक सुंदर लहानशी नदी पुलावरून क्रॉस करून वर पायऱ्या चढत जायचे. हा पायऱ्या असलेला रस्ता नारळ पोफळींच्या बागेतून जातो त्यामुळे रस्ताभर हिरवीगार झाडे आणि सावली आहे. रस्त्याबरोबर कडेने पाटाचे स्वच्छ नितळ पाणी खळाळत असते.