हिमालय - पिंडारी - ओडोरी

हिमालय १ - तयारी आणि सुरुवात

इथुन पुढे पाच दिवस आमचा दिनक्रम साधारण ठरलेला होता. ५ वाजता कोरा चहा, ६ वाजता नाष्टा, ७ वाजता त्या दिवशीच्या ट्रेकला आरंभ. आमच्या बरोबर आमचे ट्रेक लिडर, गाइड असणार होते आणि बाकीचा कंपू म्हणजे कूक, मदतनिस आणि आमचं सामान वाहून नेणारी खेचरं, हे सगळे आमच्या नंतर बाकी आवरून आमचे दुपारचे जेवण घेऊन येणार होते.
आमच्या बरोबर आम्ही पाणी, रेनकोट, थोडा कोरडा खाऊ, सुकामेवा अशा गरजेच्या गोष्टी घेऊन जायचो. सकाळी एकेकाने तंबूतून सगळं आवरूनच बाहेर पडायचो. इतकं वाकून तंबूमधे ये-जा करणं एक दोन दिवसांत नकोसं होतं. तिथल्या मायका नावाच्या दगडांवरून वहात येणारं पाणी पचायला जड असतं. त्यामुळे उठल्या उठल्या एकदा आणि त्या शिवाय एक दोन वेळा टॉयलेट टेंट ला भेट द्यावी लागायची. सूर्य मावळला की गारवा वाढत जातो. त्यामुळे संध्याकाळीदेखिल जेवण, गप्पा, टॉयलेट टेंट-भेट सगळं उरकूनच तंबूत sleeping bag मधे शिरायचं ते थेट पहाटे बाहेर हे रुटीन आपोआप बसतं. रात्रीचं जेवण ७ वाजता असल्याने ८ किंवा जस्तित जास्त ९ पर्यंत झोपलो की सकळी ४:३० लाच जाग यायची आणि बाहेरही उजाडलेलं असायचं. त्या गारेगार पाण्याने एक दिवस दात घासणे कार्यक्रम केला पण मग राहिलेले दिवस नुसत्या चुळा भरल्या. आंघोळीचा तर विचारही केला नाही *JOKINGLY*  68
तर आज पहिल्या दिवस तसा सोपा होता. ५ किमी चा रस्ता होता. तोही गावातून जात असल्याने इकडे तिकडे बघत, रमत गमत पोचलो. गावातून आल्यामुळे घरं, शेतं बघत मजा करत करत आलो. ताज्या लसणीचा गावात सगळीकडे घमघमाट होता. गावतली कुत्री एकदम प्रेमळ असावीत. आम्ही मधे एका देवळाच्या बाहेर जागा होती तिथे टेकलो. २-३ कुत्री आमच्या अवती भवती नाचु लागली. एक कुत्रा तर अर्ध्या रस्ता आमच्या बरोबर आम्हाला कंपनी द्यायला आला. ओडोरी नावाच्या या पहिल्या कॅम्प साइटला पोचलो. नदीच्या कुशीतली कॅम्प साइट बघून जीव सुखावला.
campsite2_0.jpg

सगळ्यांचं फोटोसेशन, बागडणं सुरु झालं
campSite1.jpg

आजचा दिवस असाच संपला. उद्या याहून जरा मोठा पल्ला होता आणि उंची वाढत जाणार होती. अजुनही हिमालयाचं दुरुनच दर्शन होत होतं. आज बिच्छु काटा अशा विनोदी नाव असलेल्या वनस्पतीची ओळख झाली. तिच्या काट्यांनी काही जणांना प्रसाद दिला. पण मग जवळच उगवणारी पालकासारखी दिसणारी दुसरी वनस्पती यावरचा उतारा आहे अशी महिती मिळाली. ती पानं चुरगाळून त्याचा रस चोळला की दाह कमी होतो. ओक्सीमीटरने माझा ऑक्सिजन नेमका पहिल्याच दिवशी जरसा कमी दाखवल्याने थोडी अस्वस्थ झाले. पण नंतर सगळे दिवस आकडे अगदी व्यवस्ठित होते.

हे असेच काही फोटो
view1.jpg

view2.jpg

Me1_0.jpg

हिमालय - पिंडारी - ओडोरी ते खाती

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle