केशवराज मंदिर. गाव- आसूद, तालुका- दापोली, जि. रत्नागिरी. हे गाव दापोलीकडून आंजर्ले गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे. खाली गाडी पार्क करून मिनी ट्रेक करून वर टेकडीवर देऊळ आहे. एक सुंदर लहानशी नदी पुलावरून क्रॉस करून वर पायऱ्या चढत जायचे. हा पायऱ्या असलेला रस्ता नारळ पोफळींच्या बागेतून जातो त्यामुळे रस्ताभर हिरवीगार झाडे आणि सावली आहे. रस्त्याबरोबर कडेने पाटाचे स्वच्छ नितळ पाणी खळाळत असते.
वर पोहोचताना जरा दम लागतो पण पोचल्यावर तो शीण कुठल्याकुठे पळून जातो. थंड वारा, गोमुखातून खळखळत पडणारे पाणी. हे पाणी झाडाच्या मुळाशी उगम पाऊन येते आणि जमिनीतून आल्यामुळे खूप थंड आणि नितळ असते. देउळही जुन्यातले, गर्दी नसलेले आहे त्यामुळे ती शांतता अनुभवत तिथे बसल्यावर प्रसन्न वाटते. मला खरंतर असं देवळात वगैरे जायला किंवा धार्मिक टुरिझममध्ये इंटरेस्ट नाही पण इथे आल्यावर निसर्गाच्या खूप जवळ आल्यासारखं आणि खूप शांत वाटलं म्हणून ही जागा खूप आवडते. हल्ली पर्यटकांना ही जागा कळली आहे पण तरी चढून जायचे कष्ट असल्यामुळे भंकस पब्लिक इकडे वळत नाही. गेल्या पाच दहा वर्षांपूर्वी ही फारच अनवट जागा होती.
मला फोटो सापडले नाहीत, म्हणून काही लिंक्स देते.
मंदिराचा रस्ता