लायझॉलच्या फेक लॅव्हेंडर वासाने हवा भरून टाकत सफाईवाल्याचा मॉप पुढे सरकला. जिकडे तिकडे फक्त नर्सेसच्या चटचट चालणाऱ्या पावलांचा आवाज वगळता शांतता पसरली होती. कोपऱ्यातील एकुलत्या पामच्या झाडानेही दमून पाने जमिनीकडे झुकवली होती. कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना डॉक्टरांच्या केबिन्स होता. एकेक दार पास करत सुबोध त्याला हव्या त्या काचेच्या दारासमोर थांबला आणि समोरच्या स्टील नेमप्लेटकडे बघून एक खोल श्वास घेतला.
Dr. Anish Pai
MS (Gen Surg.) M.Ch (Cardiovascular & Thoracic)
सगळीकडे अंधार दाटला होता. तिच्या अंगावर शाईसारखा पाऊस कोसळत होता. कुठेतरी वीज कडाडली आणि पावसाचे थेंब सुईसारखे टोचू लागले. तिच्या तोंडावर एक पंजा दाबला गेला आणि पाठ मागच्या ओल्या खरखरीत दगडी भिंतीला चिकटली. तोंडावरचा हात बाजूला होऊन त्याचा चेहरा तिच्यासमोर आला आणि तिने किंचाळायला तोंड उघडले. तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता तरीही तशीच मुक्याने किंचाळत राहिली.
नोटीस देऊन एक आठवडा झाला तरीही हे लग्न खरंच होतंय असं दोघांनाही जाणवत नव्हतं. आपापल्या रुटीनमधून दोघांनीही एकमेकांना क्वचित वाटलं तरी आढेवेढे घेत काही कॉन्टॅक्ट केला नव्हता. बुधवारमुळे रिसॉर्टवर गर्दी कमी होती म्हणून तो जेवायला घरी गेला. आईने नेमकं चिंबोऱ्यांचं लालभडक कालवण केलं होतं. पलाश बऱ्याच दिवसांनी जेवायला आला म्हणून वहिनीने हौसेने सोलकढीही केली. गरमागरम फडफडीत भातावर कालवण ओतून जेवल्यावर ती परफेक्ट थंडगार सोलकढी पिऊन तो थेट स्वर्गात पोहोचला होता. आई आणि वहिनी नोराबद्दल वेगवेगळी माहिती, तिची आवडनिवड विचारत होत्या पण त्याला अर्थातच काही माहीत नव्हते.
अचानक वाजलेल्या मोबाईलच्या रिंगने नोरा विचारचक्रातून खडबडून बाहेर आली. पोटाशी धरून ठेवलेली उशी बाजूला ठेऊन तिने फोन उचलला. अनोळखी नंबर बघून कपाळावर आठ्या आल्या तरी तिने तो उचलला.
"हॅलो नोरा.." त्याचा काही तासापूर्वीचा कॉन्फिडन्ट आवाज आणि आताचा तिचा अंदाज घेणारा शांत आवाज तिला समजला.
"हाय. पलाश?" तिने विचारले.
"हम्म. मी कॉल का केला त्याचं कारण एव्हाना तुला कळलंच असेल." तो म्हणाला.
"हो. घरात राडो सुरू आसा. तुका माजो नंबर खंय मेळलो ?" नोराला आता त्याचाही राग येऊ लागला.
केक खाऊन सगळे आपापल्या टेबलवर सेटल होताच डीजेने डान्सची घोषणा केली. सगळे दिवे बंद झाली आणि झगझगीत फोकस मिनूचा हात हातात घेऊन डान्स फ्लोरवर जाणाऱ्या वरूणवर पडला. आय फाउंड अ लव्ह.. फॉर मी.. म्हणत एड शीरानचा आवाज सगळीकडे पसरला. त्या तालावर मिनू वरूणचा स्लो वॉल्ट्झ सुरू झाला आणि रात्र रोमँटिक झाली. एकेका ओळीवर हौशी लोकांनी कोरस सुरू केला. चार कडवी झाल्यावर गिरकी घेऊन मिनू थांबली आणि तिने बाकी कपल्सना जॉईन होण्याची रिक्वेस्ट केली. त्यांच्या नातेवाईकांपैकी तीन चार जोड्या जॉईन झाल्या आणि गाणं पुन्हा सुरू झालं.
दाराबाहेर उन्हात चमकणारी थार पाहून नोराच्या पोटात खड्डा पडला. केक सांभाळत, खड्डे चुकवत कमीत कमी स्पीडने ब्लू लगूनपर्यंत पोहोचायला पाऊण तास तरी लागेल. पाऊण तास एकटीने या माणसाबरोबर घालवणे ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तरीही धीर करून ती उभी राहिली. तिच्याबरोबर आतून ममाचा मदतनीस ऑली हातात केक बॉक्स घेऊन आला. ड्रायव्हर सीटवर तिच्या ओळखीचे जेलने सेट केलेले केस किंवा महागडा रेबॅन न दिसता वेगळंच डोकं दिसत होतं. ती पुढे जायच्या आत तो माणूसच खाली उतरला.
"हॅलो मॅम, मला पलाश सरांनी केक न्यायला पाठवलंय. मी मुकेश, रिसॉर्टवर काम करतो." तो हसून म्हणाला.
कधी नव्हे तो वेधशाळेने दिलेला वादळी पावसाचा इशारा जांभूळवाडीत तरी आज खरा ठरला होता. सकाळपासून फिरून फिरून येणारा सोसाट्याचा वादळी वारा, शब्दशः मुसळधार पाऊस आणि या दोहोंचा मिळून ऐकू येणारा रौरव यात समोरच्या माणसाचे बोलणेही ऐकू येत नव्हते. जागच्याजागी स्प्रिंगसारखी हलून कंबरेतून वाकणारी भलीमोठी झाडे आजपर्यंत कोणी पहिली नव्हती. माडा पोफळींची झुलून झुलून वाताहात झाली होती. झाडांवर तयार फुले, फळे तुटून चिखलात पडून अजूनच राडा झाला होता. रस्त्यातून तांबडेलाल चिखलमिश्रित पाणी फुफांडून वहात होते. आजूबाजूच्या घरांवरचे पत्रे ताडताड उडून गर्जत होते. काही घरांची कौले उडून गेली होती.
'आपल्यामधली मौनाची दरी पसरतच चालली आहे आणि मी त्या गर्तेत खोल खोल जातोय.'
आदित्यने डायरीचे पहिलेच पान उघडले होते. दुपारचा चहा झाल्यावर बाबांच्या कपाटातली पुस्तके खालीवर करून बघताना मध्येच त्यांची डायरी त्याच्या हाती लागली होती. त्यांच्या वैयक्तीक गोष्टी वाचू नये असा एक विचार एकवार त्याच्या मनात चमकून गेला पण आता बाबा नाहीत तर काय हरकत आहे म्हणून त्याने डायरी बाहेर काढलीच. बाबांच्याच आरामखुर्चीत बसून त्याने डायरी उघडली.
कांगडा टीच्या चौकोनी डब्यातून आदित्यने किटलीत चहा घातला. उकळत्या पाण्यात हलकेच पसरणारा सोनसळी रंग पहात त्याने आलं ठेचून दोन तुकडे घातले आणि खूष होत किटलीवर दरवळणाऱ्या वाफेत नाक खुपसून खोलवर श्वास घेतला. किटलीवर झाकण ठेवताना समोर काचेतून त्याची नजर लांबवर पसरलेल्या हिरव्यागार देवदारांच्या दाटीतून खळाळत्या बस्पाच्या प्रवाहापर्यंत गेली. उन्हात चमकत्या पाण्याकडे पाहता पाहता त्याला तो दिवस आठवला...