ही शशक एका उपक्रमासाठी लिहिली होती, valentine month म्हणून आता इथे आणली आहे :P
-----
"आत्ता तुला जगातली कुठलीही गोष्ट मिळणार असेल तर काय मागशील?" खट्याळ हसत तिने विचारलं.
टेरेसवर आडवं होऊन वरचं टिपूर चांदणं न्याहाळतानाच मी उत्तर दिलं, "तू!"
"प्चss काय हे? दुसरं काहीतरी सांग"
"मग जास्तच तू!"
"कसला बोअर आहेस! मी आहेच तुझी.."
"मला अख्ख्या जगात फक्त तू हवी आहेस."
"मॅड!! आय लव्ह यू..."
"आय लव्ह यू टू!"
ती किंचाळून उठायला लागली, पण मी चपळ आहे. पुढच्या मिनिटात ती बिल्डिंगखाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.