"अनंतमोदक! सी! आय रिमेम्बर द नेम ऑफ युअर बिल्डिंग नाउ." तो उत्साहाने ड्राइव्ह करता करता म्हणाला. "येतं मला मराठी!"
"व्हॉट यू जस्ट सेड, मीन्स नेव्हर एंडिंग मोदक!" ती हसून हसून वेडी झाली. "द नेम इज अनंतमोचन!"
"Whatever! तू खूप सुंदर दिसते आहेस, हे बरोबर?" तो तिच्याकडे बघत म्हणाला.
"धन्यवाद, धन्यवाद.. गोखल्यांकडे जाऊन आल्यावर तुझं मराठी एकदम प्रो होणार बघ" ती चिडवत म्हणाली. "इंद्रनील, यू हॅण्डल्ड इट सो वेल! माझ्या बाबांना खिशात टाकणं सोपं काम नाहीये. काय acting होती, वाह वाह!"
त्याने तिच्याकडे रोखून पाहिलं मग खोटं हसत म्हणाला, "आफ्टरऑल मार्केटिंगवाला बंदा हूँ!"