"आणि इंद्रनील आहे का अजून तिथे? दो दिन पहले कॉल किया था उसने. त्याला सांगू नको, सरप्राईज देते है. क्रिती और उसको नॉलेन गुडेड रोशोगुल्ला बहुत पसंद है, मैने ढेर सारा बनाया था तो लेके आ गई. खूष हो जायेगा लडका. अरे अँड व्हॉट अबाऊट दॅट ओल्सन केस? कौन गया था NCLT में?" अरूआंटी घाईघाईत बडबड करत होती. "अरे अब सब यही बोल दोगी क्या, घर जाके बोलो ना.." मागून अंकलची अस्पष्ट कटकट ऐकू येत होती.
मनवा फोनवर बोलत बोलत बाहेर आली तेव्हा नीलचे दार आतून बंद होते. ती हसत म्हणाली "हां आंटी, ऑल ओके. इंद्रनील इज स्लीपिंग इन हिज रूम. बस आप आ जाओ, फिर बात करते है.."
फोन सोफ्यावर टाकून तिने भराभर मेंटल चेकलिस्ट टिक करायला सुरुवात केली.
१. लिविंग रूम आणि किचनमधला पसारा आवरायला घेतला. तसा पसारा काही नव्हताच तरी काही चॉकलेट, बिस्किटांचे चुकार रॅपर्स वगैरे होते ते तिने डस्टबिनमध्ये कोंबले.
२. कलाबाईंना फोन करून अरुआंटी आल्यामुळे आजपासून परत यायला सांगितले.
३. तिची बेडरूम आवरली, कपडे घडी करून बॅगेत भरले, बाथरूममध्ये जाऊन ब्रश करून लगेच तिच्या ब्रश, पेस्ट, बॉडीवॉश, शाम्पू, परफ्युम वगैरे सगळ्या डब्याडुब्या जमवून आणून बॅगच्या वरच्या कप्प्यात ओतल्या. आंघोळ घरीच करेन म्हणत टॉवेलही घडी घालून बॅगेत टाकला.
४. फ्रीजमधल्या गुलाबजाम आणि जोईसाठी ठेवलेल्या चिकनबद्दल आंटीना सांगणे.
शेवटचं सोडून ऑल checked!
बेडवर काढून ठेवलेली ब्लॅक जीन्स आणि शेवाळी रंगाचा बाह्या फोल्ड केलेला लिनन शर्ट घालून, पोनीटेल बांधून तयार होऊन ती कॅण्डी क्रश उघडून बसली. पण खेळणं सोडून तिचे हात मोबाईलवर तसेच राहिले. तिच्या मनात फक्त आणि फक्त इंद्रनील घर करून बसला होता. परवाची ती मॅजिकल संध्याकाळ, त्यांच्यातली वाढलेली जवळीक आणि तिने निर्दय होऊन त्याला तोडून टाकणे.. आणि आता तो पुन्हा तिला कधीच दिसणार नव्हता. तिला स्वतःचाच खूप राग येत होता. पण ही गोष्ट करणे खूप गरजेचे होते. ती स्वतःला आटून गेलेल्या नदीसारखी समजत होती, जिच्या नीरस, भुसभुशीत वाळूत आता कधीच कुणाची पावलं उमटणार नव्हती. कुणालाही जीव लावण्याइतकं प्रेम आता तिच्याकडे शिल्लकच नव्हतं. हे सगळे विसरून जायला ती पटापट कँडीची एकेक रांग ब्लास्ट करत सुटली.
खाली कॅब येऊन थांबल्याचा आवाज आला तेव्हा तीने टेरेसमध्ये जाऊन आंटीना हात केला आणि पळत खाली गेली. त्यांना बॅग्ज आत आणायला मदत करत तिने चहा ठेवला. ते फ्रेश होऊन येईतो चहा तयार होता. त्यांच्याबरोबर डायनिंग टेबलवर बसून चहा झाल्यावर तिने अरू आंटींची सगळी उत्तरं दिली.
"आय हर्ड, इंद्रनीलसे तुम्हारी अच्छी दोस्ती हो गई थी.. तो डिनरला आला होता ना तुझ्याकडे? आम्हाला खूप आनंद झाला. जनरली तो शाय आहे असं जेवायला वगैरे जात नाही कोणाकडे. ही इज व्हेरी आउटस्पोकन प्रोफेशनली, बट हिज पर्सनल लाईफ? नोप! ही वोन्ट डिसक्लोज अ सिंगल थिंग. समटाइम्स आय वरी अ लॉट. बट अच्छा बच्चा है. उससे बात करती रहना.." आंटी तिच्या हातावर थोपटत म्हणाल्या.
"अरू, उसे भी वो रोशोगुल्ला दे दो ना पॅक करके, घर लेके जाएगी" सिंकपाशी कप ठेवत अंकल म्हणाले.
"हा, हा रुको मनवा. क्रिती हॅड ऑर्डर्ड सम नॉलेन गुड, सो आय युज्ड ऑल ऑफ इट अँड मेड दीज मेनी रोशोगुलाज. फिर भी नील को ये कम पड जाएंगे देखना.." म्हणत आंटीनी एका टपरवेअरमध्ये भरपूर रसगुल्ले घालून तिच्या हातात दिले.
"थँक्स आंटी, आय'ल लीव्ह नाउ.. बाय, सी यू इन द ऑफिस. हां और वो ओल्सन का हिअरिंग हो गया, नाउ वी आर वेटिंग फॉर द ऑर्डर." घाईघाईने तिच्या गोंडे लावलेल्या कोल्हापुरी चपला पायात अडकवत ती म्हणाली.
"थँक्स टू यू मनवा, यू केम अँड मॅनेज्ड ऍट सच अ शॉर्ट नोटीस. यू नो ना जोई को वो सिटर्सके पास रहना पसंद नहीं, ही गेट्स सो लोनली.. चलो उस महाराजासे मिलती हुं, अंकल के सरपे बैठा होगा!" त्या दारात येत म्हणाल्या.
हसून त्यांना बाय म्हणून मनवाने हेल्मेट घालून, बॅग पायाशी ठेवून तिची डिओ वळवून गेटकडे घेतली आणि स्टार्ट करताना हळूच वर पाहिलं तर टेरेसमधून अंकल जोईचा पंजा हलवून तिला बाय करत होते. तिनेही हसून "बाssय जोई" ओरडून त्याला अजून भुंकायला लावले. खालच्या खोलीच्या खिडकीची काच आणि पडदा आताही बंद होता. तिने मान हलवून गाडी सुरू केली आणि पटकन गेटबाहेर गेली.
ऑफिसला गेल्यापासून तिची पेंडिंग कामं आणि अपॉइंटमेंट्स संपवता संपवता संध्याकाळ झाली. अधूनमधून पारुल तिला अरुमॅमच्या हॉट नेफ्यूबद्दल विचारायचा प्रयत्न करत होती पण मनवा तिला व्यवस्थित डॉज करत होती. रोज रोज दिवस रात्र तिचं तेच ते रुटीन बाय हार्ट केल्यासारखं सुरू होतं. पंधरा वीस दिवस गोल गोल तेच तेच जगून शेवटी तिचा बांध फुटला. ऑफिसमध्ये ती तिच्या खुर्चीत बसून हाताने टेबलवेट फिरवत विचार करत होती. तिने तिचं डोकं हेडरेस्टला टेकवलं आणि डोळे मिटून घेतले. आज पुन्हा तिला खाऱ्या पाण्याचे लोट वाहू द्यायचे नव्हते. दिवसभर तिला काहीच सुचत नव्हतं. कामासाठी डेस्कटॉपवर तीन वेळा तरी न्यू वर्ड फाईल ओपन करून काहीच टाईप न करता तिने बंद करून टाकली होती.
टी ब्रेकमध्ये पारुल काहीतरी सांगायला तिच्या केबिनमध्ये डोकावली तेव्हाही ती डोळे मिटून बसली होती. "मनवा? व्हॉटस राँग?" तिने खांद्यावर हात ठेवत विचारले.
"आयम गोइंग मॅड डूड! क्या करू, कुछ समझमे नही आ रहा.." ती डोळे मिटल्या मिटल्याच म्हणाली.
"कमॉन! टेल मी एव्हरीथिंग फ्रॉम द स्टार्ट. डोन्ट मिस अ सिंगल स्पेक्. मनवा, बस नेss लाईफ है, तकलीफ तो रेवानीss" पारूल तिला दरडावत तिचे हात धरून समोरच्या खुर्चीत बसत म्हणाली. रागात असल्यावर तिच्यातली गुजराती बेन सगळी दारंखिडक्या तोडून बाहेर यायची.
"दॅट डे अरूमॅम कॉल्ड मी टू स्टे ऍट हर हाऊस टू टेक केअर ऑफ जोई टिल दे रिटर्न.." तिने सांगायला सुरुवात केली. तासाभराने सगळी गोष्ट सांगून संपली तेव्हा तिच्या डोळ्यातून ऑलरेडी पाणी वाहायला लागलं होतं.
"मनवा! यू डफर! मने समजायू.. धिस वॉज अ गोल्डन चान्स, इतना सही आदमी कहा मिलनेवाला है! व्हॉट इज धिस यार, ऍट लीस्ट उसे डेट तो करती.. चल ये बता वो रहता किधर है.."
"समव्हेअर इन अंधेरी"
"पागल! ऍड्रेस भी नई, नंबर है?"
"हम्म बट आयम नॉट गोइंग टु.." म्हणेपर्यंत पारूलने तिचा फोन खेचून कॉन्टॅक्टस मध्ये सर्च सुरू केला होता. "पारुल, स्टॉप, डोन्ट डू इट.." म्हणत ती फोन खेचू लागली तर पारूलने फोन स्पीकरवर टाकून उंच धरला. "द नंबर यू आर ट्राइंग टू कॉल इज नॉट रीचेबल" फोनमधून आवाज येत होता. लगेच ती एक विनिंग स्माईल देत खुर्चीत बसली. "गधेडी!" पारुल खालच्या आवाजात पुटपुटली.
"सोशल मीडिया? फेसबुक, ट्विटर? पारुलने टिचक्या वाजवत विचारले. "ज्यादा युज नही करता, इंस्टा पे दिखता है कभी कभी." त्याचे इन्स्टा नेम सांगत मनवा हळूच म्हणाली.
"अरे फिर तो ग्रॅब हिम, छोड ही मत उसको. आजकल पता है दीपेश इतना पबजी खेलता है, मेरी तरफ देखने का टाइम नही है उसको." म्हणत तिने इंस्टावर त्याचं Drifter_Neil अकाउंट उघडलं. आकाश, लाटा, उंच खडबडीत खोड असलेली झाडं, निरनिराळे डोंगर, पाण्यात चमकणारा चंद्र असेच सगळे आर्टसी फोटो होते. "अब्बे.. म्हणत ती फोन खाली ठेवणार इतक्यात एक नवा फोटो पॉपअप झाला.
'मोरपंखी निळ्या रंगाच्या ट्रेनचे दार, ज्याच्या बाजूला खिडकीखाली DHR 126 लिहिले होते.'