त्वचेच्या रंगांवरून अगदीच वेगळे ओळखे जाऊ अशा देशात मी राहतेय सध्या. आपण कितीही म्हटलं तर मनाच्या एका कोपऱ्यात आपण खरंच सामावले जाऊ का इथल्या लोकांच्यात हा प्रश्न येतोच. मुलाची शाळा इंटरनॅशनल स्कूल. त्यात जगाच्या चारी कोपऱ्यातून आलेली पिल्लं. माझ्या पिल्लासारखीच. हसरी पण नवीन जागेला बावरलेली. पण ती एकमेकांचे छान दोस्त होतात. नवऱ्याच्या ॲाफिसमध्येही तसेच पूर्ण जगभरातून आलेले लोक. पण काम करता करता त्यांचीही गट्टी होते. राहता राहिले मी. सध्या ऑफिसला जात नसल्याने माझा तो लोकांच्यात मिसळायचा मार्ग नाही. मग उरतात मला रोज भेटणारे लोक.