मी एकटी राहते म्हणून मला माझ्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी सोप्या कशा होतील याकडे फार लक्ष द्यावं लागतं.
उदाहरणार्थ, पार्सल येणार असेल आणि मी नेमकी अंघोळीला असेन किंवा बाहेर जाणार असेन, तर मला डिलिव्हरीवाल्याला फोन करून सांगावं लागतं – "पार्सल सिक्युरिटीकडे ठेव", "शेजारी दे" वगैरे. त्याला हे आधीच कळवणं गरजेचं असतं, कारण मी बाहेर गाडी चालवत असेन आणि त्याच वेळी त्याने मला फोन केला, तर तो गोंधळेल आणि त्याचा वेळ वाया जाईल – हे टाळणं हेच माझं उद्दिष्ट असतं. मग शेजाऱ्याला सांगणं, डिलिव्हरीवाल्याला नेमकी वेळ विचारणं – यात बराच वेळ जातो.
21st October 2022
आज दुपारी एक मजाच झाली. प्राची लॅपटॉप वर काम करत होती आणि मी नेहमीप्रमाणे दरवाज्यात लोळत पडलो होतो. तर एकदम गेटमधून कोणीतरी आत यायला लागलं. मी मान वर करून पाहिलं तर मिहिका....
मी उड्याच मारायला लागलो. जोरात भुंकून हाका मारल्या प्राचीला. मग ती बाहेर आली आणि नेहमीप्रमाणे तिनं नो एक्के नो नो दुणे नो सुरू केलं. पण मला काही सुचतच नव्हतं. मी घरभर धावत सुटलो. जोरजोरात गाणी म्हणू लागलो. ती गाणी ऐकून मिहिकाबरोबर तिचे दोन फ्रेंड्स आले होते ते 'आंटी बाद में आते है ' म्हणत पळूनच गेले.
21st March 2023
या प्राचीच्या कानांचं काही तरी करायला हवं. माझ्या सोबत राहून राहून एकदम तिखट झाले आहेत तिचे कान. एरवी गच्चीवर गेल्यावर मी उंच उडणाऱ्या विमानावर उड्या मारत मारत भुंकतो, तेव्हा आकाशाकडे बघत म्हणते,"तुला कसं कळतं रे विमान उडत असलेलं? एवढासा ठिपका दिसतोय अगदी लक्ष देऊन बघितलं तर. आवाज पण ऐकायला येत नाहीये मला. तुला कसं कळतं?"
10th November 2023
मी हल्ली सकाळी फिरून आलो की अजिबात पोर्चमध्ये थांबायला तयार नसतो. दरवाजा जोरजोरात वाजवून उघडायला लावतो. मग पळत जाऊन बेडवर शेपटीत नाक घुसवून बसतो. प्राची म्हणत होती की जिंजरने विंटर डिक्लेअर केला आहे. आता जिंजरची औषधं आणून ठेवली पाहिजेत. तिच्या मते मी शंतनुसारखाच नाजूक तब्येतीचा आहे. लवंगाने उष्णता आणि वेलदोड्याने थंडी... असं काही तरी म्हणत होती.
काल फिरून आल्यावर मला खूप खोकला आला. शेकोटीच्या धुरामुळे तसे झाले असावे असे प्राची म्हणाली. 'दिल्लीचा असूनही असा कसा काय रे तू' म्हणाली.
मला एरवी खोकला झाला की ती मला मध पाणी देते.
मागच्या आठवड्यात गुरुवारी दुपारी जेवत असताना अचानक माझ्या whatsapp वर मला एक मेसेज आला "Dakshina .. from ? मी एक क्षण बावचळले पण नोटिफिकेशन बार खाली ओढून वाचलं ते इतकंच होतं. मी जेवत होते त्यामुळे उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. पुन्हा काही सेकंदांनी दुसरा मेसेज ... माझं नाव...XXX मी अवाक.. कारण माझ्याकडे तो नंबर एका पुरुषाच्या नावाने सेव्हड होता आणि मला जो मेसेज आला होता तो एका स्त्रीचा होता.. कारण त्यात तिने तिचे नाव लिहिले होते. मग माझ्या डोक्यात नाना प्रकारचे विचार यायला लागले. की ही स्त्री नक्की त्याची बायको असणार आणि हिला काहीतरी संशय वगैरे आला असेल का?
माझी आई सौ. स्नेहल चंद्रशेखर जोशी.... हिच्या बरोबर खरंतर माझ्या काही आठवणी नाहीतच. कारण ती हे जग सोडून गेली तेव्हा मी जेमतेम सात वर्षांची होते. मी जे काही इथे लिहितेय ते नातेवाईक आणि जवळच्या कौटुंबिक स्नेह्यांकडून ऐकलेलं आहे.