मंगळूरमध्ये असतानाची गोष्ट. सकाळी पेपर आल्या पहिलीच बातमी वाचली आणि धसकले. नवर्याला म्हटलं, “अरे, ऐकलंस का? सिस्टर स्टोनमधला एक दगड पडला म्हणे” तो ऑफिसच्या गडबडीत असल्याने दगड माझ्याच डोक्यात पडला असता तरी काही फरक पडला नसता अशा आवाजात “आरेरे, वाईट झालं” वगैरे काहीतरी म्हणाला. पण रूखरूख लागून राहिली ती मलाच.
मी अमेरिकेत रहायला आले तेव्हा पानगळीचा ऋतू होता. भगवी, पिवळी, लाल, हिरवी पानं; सोनेरी, केशरी, पिवळट, धुळकट रंगाचे पायाशी पडलेले पानांचे गालिचे आणि रस्त्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले उंच झाडांचे, मनाला आणि डोळ्याला दिपवून टाकणारे जिवंत कॅनवास; पानगळ होत असली तर हवेत नव निर्मितीची चाहूल होती असं मला वाटलं होतं. नवीन देशात ह्यापेक्षा दुसरं अनोखं स्वागत अजून काय असू शकतं? असं सगळं poetic वगैरे मला पहिले सात दिवस वाटलं असेल, मग साडे चार ला होणारा अंधार खटकायला लागला, थंडी बोचायला लागली.
माझ्या आईच्या पश्चात इतके वर्ष बहिणीने संभाळलेली तिची नथ अलीकडेच फार मोठ्या मनाने तिने मला दिली. त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. मला स्वतःला नथ घालणे खरं तर आवडत नाही पण तरी ही आईची नथ तिने मला दिली हा मला माझा सन्मानच वाटला. त्यावेळी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.
मी शाळेत असताना रविवारी 'रंगोली' कार्यक्रमात 'मेरा जूता है जापानी' हे गाणं बरेचदा लागायचं आणि खूप आवडायचंही. भविष्यात कधीतरी या देशात जाण्याची आपल्याला संधी मिळेल असा विचार करण्याचंही ते वय नव्हतं. पुढे नोकरीत जपानी लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या वर्कोहोलिक पणाचा पुरेपुर अनुभव घेतल्याने जपानला जाण्याचे योग कधी म्हणजे कधीच येऊ नयेत असं वाटू लागलं. पण जेवढा तुम्ही एखाद्या गोष्टीला विरोध करता, त्याच्या दुपटीने ती गोष्ट तुमची वाट बघत असते असे काहीसे होत अखेर पहिले परदेशगमन जपानला होणार यावर (काहीशा नाईलाजाने) शिक्कामोर्तब झालं.
त्या दिवशी आलासंच ना कृष्णा तळ्याकाठी फक्त माझ्यासाठी ? मी काही कुणी सर्वशृत , सुपरिचित गौळण नाही की कुणी नाही. एक साधी सर्वसामान्य गौळण मी. माझ्यासाठी आलास?
अन तुला कळलं कसं की माझ्या मनात काय आहे ते ? मी तर हळूच चांदण्यांच्या साक्षीने तळ्यातल्या कमळांना सांगितलं होतं. वाऱ्यावर अलवार डोलून त्यांनी मला ऐकल्याची पोच दिली होती.
कमळांनी हळूच वाऱ्याला सांगितलं आणि मग त्याने तुला निरोप धाडला का ? कसा ? की सगळ्या फुलांच्या अंतरंगातलं सौंदर्य म्हणजे तूच आहेस?
बाळाच्या जन्मानंतर अवघ्या काही तासातच बाळाचे काळेभोर आणि भरपूर जावळ हा एक कौतुकाचा विषय होतो. डॉक्टर, सुईण, आजी आजोबा, मावश्या, काका, आत्या असा समस्त परिवार "काय सुंदर जावळ आहेत" असं म्हणू लागतात आणि बाळाच्या आई बाबांनाही ते आनंद दायीच असतं. भारतात जाऊ तेव्हा बाळाचे जावळ काढावे लागतील याबद्दल अधून मधून बोलणं होत राहतं. बाळाचे केस धुणे हा कार्यक्रम बाळाला रडवून अधून मधून होत राहतो. पण केस धुणे प्रकार आई बाबांना त्यामानाने आपल्या आवाक्यातला वाटत असतो. आता या सगळ्या गोष्टीना ' छान आहेत' वरून 'केवढे वाढले' असं वळण लागतं.
आपल्याकडे शुभकार्यासाठी किंवा कुळाचारासाठी केलेल्या नेवैद्याच्या पानात खीर आणि पुरण ह्यांना खूप महत्व आहे. आमच्या लहानपणी अशा खास प्रसंगी जेवणाची सुरवात आम्ही खीरीनेच करत असू . त्यामुळे आई वडिलांना दीर्घायुष्य मिळते अशी आमची समजून होती. जेवताना कोणी खीर पहिल्यांदा खायला विसरली तर त्यावरून आम्ही तिला पीडत ही असू. एरवी शेवयांची, रव्याची, दुधी भोपळ्याची अशा विविध खीरी केल्या तरी शुभकार्यात केली जाणारी खीर नेहमी गव्हलयांचीच असते. पूर्वी स्त्रिया घरी होत्या आणि असे जिन्नस बाहेरून विकत आणण्याची मानसिकता ही नव्हती त्यामुळे गव्हले , शेवया वैगेरे सगळं घरीच केल जात असे.