मी शाळेत असताना कधीतरी (नक्की साल लक्षात नाही) एकदा मी संध्याकाळी घरी आले तेव्हा आई बाबा बाहेर गेले होते. दिंदीला (माझ्या मोठ्या बहिणीला) विचारलं तर ती म्हणाली,’ सोहोनी काकूंकडे गेलेत.”
ते ऐकताक्षणी मी आनंदानी उडालेच. त्याला कारण ही तसंच होतं. काही दिवसांपूर्वी सोहोनी काकूंनी (आमच्या आईची मैत्रीण) आईला फोन केला होता .. त्यांच्या ‘डॉली’ नावाच्या पॉमेरिअन कुत्रीला पिल्लं झाली होती . ‘त्यातलं एखादं पिल्लू तुम्हाला हवं आहे का?’ या त्यांच्या प्रश्नाला आम्ही खूप जोरात ‘ होsssss ‘ असं उत्तर दिलं होतं. आणि त्या दिवशी त्यातल्याच एक पिल्लाला घरी घेऊन यायला आई बाबा काकूंकडे गेले होते.
"माणसं बदलतात".
हे असं वाक्य नेहमी एखाद्या ब्रेकअप नाहीतर घटस्फोटाच्या प्रसंगी ऐकू येतं.
"इट्स नॉट यू, इट्स मी" वगैरे.
पण माणूस बदलण्याचं एक अत्यंत टोचरं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर घडलंय, आणि त्याच्याशी माझ्या लग्नाचा थेट संबंध नाही.
माझ्या आईची जेव्हा आजी झाली, तेव्हा तिच्या भावनांनी जणू एकशे ऐंशीच्या कोनात गिरकी घेतली. पोराच्या बारशाच्या तिसऱ्या की चवथ्या दिवशी आजीबाई एक सुंदर सोन्याची (माझ्या मापाची) बांगडी घेऊन ठुमकत आल्या.
"ही माझ्या नातसुनेसाठी".
भटकेपणा बर्याच प्रकाराचा असतो. प्रत्यक्ष पायपीट हा मनापासून आवडणारा प्रकार असला तरी मनातल्या आठवणींबरोबर केलेली भटकंती त्याहून मनाजवळची अन हृद्य!
अश्या बर्याच जागा आहेत जिथे फक्त मनातच जाता येतं. माझं लहानपणीचं घर. वर्तमानात जिथे आता एक अपार्ट्मेंट उभं आहे. तोक्यामधलं एक सुंदर तळं, त्यात पानगळीच्या सुंदर रंगांचं प्रतिबिंब पाहता पाहता मला मनाचा तळ दिसला होता. लहानपणीचे आजोळचे घर, लहानपणीचीच पर्वती! आठवणीतली सफर. :)
लहानपणी आजीकडून त्यांनी एक गोष्ट ऐकली होती, बृहन्नडेची. अर्जुनासारखा शूरवीर , धनुर्धारी, महापुरुष एका वर्षासाठी स्त्री होतो त्याची कथा. दहा बारा वर्षाचा असताना ऐकलेली ती गोष्ट. राम, कृष्ण यांच्या मैत्रीच्या , पराक्रमाच्या गोष्टीनी भारून जायचं वय होतं ते. तोपर्यंत प्रत्येक खेळात त्याला राम किंवा कृष्ण व्हायचं होतं. कृष्णच जास्त. त्याची ती बासरी वाजवणं, गोपिकांसोबत मस्ती करणं हे सारंच आगळावेगळ वाटायचं. त्याचा धोरणी चतुरपणा, सोयीस्कर सबबी सारं काही मानवी वाटायचं. मग अशातच कधी तरी पांडवांची, त्यांच्या कथाविश्वात एन्ट्री झाली. पाच भावांमध्ये मिळून एकच बायको. पाच भाऊ पण.
पुन्नीचा ड्रेस निळे लेगिन्ग व टीशर्ट. त्यावर बांधलेला बर्गरचा थर्माकोल चा कट आउट. व डोक्यात हेअर
बँडला लावलेले फ्रेंच फ्राइजचे पुडके. अनुच्या आईने असेच पिझाचा चतकोर रंगवून लेकीच्या कमरेला बांधायची व्यवस्था केली होती. केसांचा पोनी बांधलेला. मुली शाळेतून बस ने येणार होत्या. मी ऑफिसातून काम उरकून ड्रायव्हरला घेउन गेले.
सीबीएससी अभ्यासक्रमानुसार शिक्षण देणार्या काही खूप चांगल्या शाळा हैद्राबादेत आहेत. मेरिडिअन स्कूल, महर्षी विद्या मंदीर , भारतीय विद्या भवन, ज्युबिली हिल्स पब्लिक स्कूल व इतरही आहेत.
ह्या अभ्यासक्रमाची जी काउन्सील आहे त्यांनी भारतभरातील सीबीएससी स्कूलस च्या प्रिन्सिपल्स ची एक कॉन्फरन्स २००६ मध्ये हैद्राबादेत आयोजित केली होती. माझी मुलगी तेव्हा महर्षी विद्यामंदीर
मध्ये दुसरी-तिसरीत होती. ही व हिची मैत्रीण अनुकृती व अनुची आई वसुधा ही आमची लोकल पार्टी. मध्ये मध्ये रिहर्सलला येउन प्रोत्साहन देणारी हसरी सविता आत्या ही एक गेस्ट कलाकार.
गर्दीमधल्या चेहर्यांची एक गंमत असते. हे चेहरे स्वत:शी फार प्रामाणिक असतात. “चार लोकांमध्ये” असूनदेखील कसलाही अभिनय करत नसतात. सच्चे असतात. मला म्हणूनच गर्दीमधल्या अशा चेहर्यांकडे बघत फिरायला फार आवडतं. प्रवासामध्ये किंवा इतरत्र कुठेही लोकांचे चेहरे निरखायचा, त्या चेहर्यामागे नक्की कसला विचार चालू असेल ते बघायचा मला एक आगळाच छंद आहे. ही व्यक्ती मला जशी दिसली तशीच प्रत्यक्षातही असेल असं नाही, किंबहुना, या व्यक्तींकडे बघताना माझा जो काही चष्मा होता त्यातूनच मी पाहिलं असणार.
मोठ्ठं पटांगण. त्यात टकला अमरीश पुरी जोधपूर किंवा तत्सम पद्धतीची पँट, वरती चमचम करणारा चांदीच्या रंगाचा बंद गळ्याचा डगला, दागिने, आणि पायात गुडघ्यापर्यंत येणारे बूट घालून उभा. त्याने मीनाक्षी शेषाद्रीला पकडून ठेवलेले.
आफ्रिकन सफारी करण्याचे स्वप्न कित्येक वर्षांनी साकार होणार होते. माझ्या आणि नवऱ्याच्या स्वभावानुसार आफ्रिकन जेवण मिळणार म्हणूनसुद्धा मन हवेत होते. १५-१६ तासाचा प्रवास करून रात्री ९ च्या आसपास नैरोबी एयरपोर्टवर उतरलो. आमचा गाईड आम्हाला हॉटेलवर सोडून, जुजबी सूचना देऊन, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला तयार रहायची आठवण करून देऊन निघून गेला. आम्हाला प्रचंड भूक लागली होती. म्हणून आम्ही हॉटेलच्याच रेस्टॉरंटकडे कूच केले. रात्रीचे १०-१०.१५ वाजले होते रेस्टॉरंट मध्ये शुकशुकाट होता. लॅम्ब चॉप्स ऑर्डर केले. जेवण येईपर्यंत धीर निघत नव्हता इतकी भूक लागली होती.
ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
------------------------------------------------------------------------------------------------