पुन्नीचा ड्रेस निळे लेगिन्ग व टीशर्ट. त्यावर बांधलेला बर्गरचा थर्माकोल चा कट आउट. व डोक्यात हेअर
बँडला लावलेले फ्रेंच फ्राइजचे पुडके. अनुच्या आईने असेच पिझाचा चतकोर रंगवून लेकीच्या कमरेला बांधायची व्यवस्था केली होती. केसांचा पोनी बांधलेला. मुली शाळेतून बस ने येणार होत्या. मी ऑफिसातून काम उरकून ड्रायव्हरला घेउन गेले.
मैत्रीणींनो, इथे आपण आंध्रप्रदेशातील जवळपासची फिरण्याची ठिकाण, ईथली संस्कृती, बोली भाषा, सण, इथली फेमस खादाडी ह्याबद्दल लिहू या.
कसे पोहचणार??
विमानसेवा आहेच सोबत ट्रेन्स आणि बस सेवा ही आहे. पुण्याची शताब्दी एक्सप्रेस मला खूप आवडते पण अजून त्याने जाण्याचा योग नाही आला आहे. ती सकाळी ६ ला पुण्यावरून सुटते आणि दुपारी अडीच ला सिकंदराबाद. हुसेनसागर ह्या ट्रेनच आणि माझ खूप जवळच नातं आहे. ह्या ट्रेननेच नेहमी प्रवास असतो. अजून बर्याच ट्रेन्स मुंबईवरून आहेत ज्यांचा पुणेला हॉल्ट असतो.