हे मिस्टर डीजे ... भाग एक

सीबीएससी अभ्यासक्रमानुसार शिक्षण देणार्‍या काही खूप चांगल्या शाळा हैद्राबादेत आहेत. मेरिडिअन स्कूल, महर्षी विद्या मंदीर , भारतीय विद्या भवन, ज्युबिली हिल्स पब्लिक स्कूल व इतरही आहेत.

ह्या अभ्यासक्रमाची जी काउन्सील आहे त्यांनी भारतभरातील सीबीएससी स्कूलस च्या प्रिन्सिपल्स ची एक कॉन्फरन्स २००६ मध्ये हैद्राबादेत आयोजित केली होती. माझी मुलगी तेव्हा महर्षी विद्यामंदीर
मध्ये दुसरी-तिसरीत होती. ही व हिची मैत्रीण अनुकृती व अनुची आई वसुधा ही आमची लोकल पार्टी. मध्ये मध्ये रिहर्सलला येउन प्रोत्साहन देणारी हसरी सविता आत्या ही एक गेस्ट कलाकार.

ह्या कॉन्फरन्समध्ये विद्यार्थ्यांतर्फे एक स्किट कम नाच सादर करायचे लोकल शाळांतर्फे ठरले. आम्ही वीकांताला आत्याकडे गेलो असताना माझा एक्स कलीग व मित्र बेग ह्याचा फोन आला कि अश्या
प्रोग्रामसाठी एक स्क्रिप्ट लिहायचे आहे. हैद्राबादचा इतिहास, त्याची उत्क्रांती, तेव्हा बंगलोर नंतर हैद्राबादचा आयटी सिटी म्हणून उदय होत होता. मुले शाळेला जाताना हायटेक सिटी/ शिल्पाराम आले की बोट दाखवून बस मधून जोरात उत्साहाने ओरडत. पुढे अजून पाच किलोमिटर मुलांची शाळा. गंगाजमनी वे ऑफ लाइफ युनिक लेयरिन्ग ऑफ कल्चरस हे सर्व त्या स्क्रिप्ट मध्ये यायचे होते.

हा मोठा कामाचा फोन झाला व हळू हळू स्क्रिप्ट बांधायला सुरुवात झाली. सिटी ऑफ पर्ल्स एंड मिनारेट्स वगैरे वगैरे वगैरे. एक दिवस रत्न सांगत आले की ती कसल्या तरी प्रॉग्राम मध्ये आहे.
फार च उत्साह दाटून आला. व रोज रिहर्सल असणार् होत्या. त्या ज्या स्कूल मध्ये आहेत तिथून एकतर पाल्याला घेउन जा नाहीतर बस उशीराने सोडेल. असा शाळेतून निरोप आला. नाचून दमलेली पोर उशीराने आल्यास पार सुकून जाईल म्हणून मी नित्य नियमाने तिला पिकप करायला जायचे ठरवले.

स्क्रिप्ट फायनल करून बेगला दिले.

आता बेगची एक्स प्रीती व तिचा ओळखीचा मित्र पंकज सर ह्यांची एंट्री. ह्या कार्यक्रमाचे कोरीओग्राफर प्रीतीचे मित्र फेलो गिटारिस्ट पंकज सर म्हणजे एक एनर्जीचा झरा कुरळे केस कायम नाचत उडत असणा रे व्यक्तिमत्व. प्रीती व पंकज छान गिटार वाजवतात. पंकज तेव्हा फिल्म्स मध्ये पण कोरीओ ग्राफी करत असे.

तर आता कार्यक्रमाच्या रिहर्सल्स सुरू झाल्या. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना चान्स द्यायचा असल्याने खूप नाच गाणी मध्ये मध्ये पेरली होती व प्रत्येक शाळांतली चमकदार मुले भाग घ्यायला मिळाल्याने उत्सुक होती. पहिल्या दिवशी कळले कि पुन्नी ज्या कार्यक्रमात भाग घेते आहे तेच आपण बेग ला दिलेले स्क्रिप्ट. मला आनंदाचा धक्काच बसला. अपर्णा सेन कंकना सेन सारखीच आपली जोडी होईल असे स्वप्न पण बघून टाकले.

सुरुवात अशी होती: गणेश वंदना. भरत नाट्यम महागणपती ह्या रचनेवर. ह्यात सहावीत असलेली एक सुश्मिता नावाची सुरेख चुण्चुणीत मुलगी आमचा अगदी आदर्श होती. छान नाचायची. व एकदम सहाव्वीत म्हण्जे किती मोठी नैका. म्हणून आम्ही तो लेंड्मार्क कधी पार करू म्हणून गोड असुयेने तिला बघायचो. ह्या नंतर हैद्राबादच ओळख करून देणारे ओपनिंग पॅराग्राफ. शहराचे नाव भाग्यनगर निझाम व भागमतीची प्रेमकथा मुलांनी सादर केली. पावसात उफाणणारी मुसा नदी पार करून प्रेमविव्हल निझाम भागमतीला भेटायला येतो. मुलांनी कापडाचे लांब तुकडे वर खाली करून लाटांचा आभास निर्माण केला. तो शहराचे नाव भाग्यनगर ठेवतो.

पुढे निझामाच्या दरबारातील कव्वाली, तेलंगणा तील कलाकारांचे नृत्य, इतर कम्युनिटीज ची नृत्ये.
हे सर्व करून मध्ये मध्ये नॅरेशन व हैद्राबादची संस्कुती एस्टॅब्लिश केली गेली.

आता शहर बदलले मॉडर्न झाले. आयटी क्राउड, नवी विटी नवे राज्य. खडा दुपट्टा व शेरवानीची जागा हळू हळू मुलींचे वेस्टर्न ड्रेस व मुलांचे स्मार्ट फॉर्मलस नी घेतली. बिर्याणी कबाबांची हलीमची जागा हळू हळू पिझा बर्गर नी घेतली. एक नवे कल्चर उदयाला आले व त्यालाही ह्या शहराने आपलेसे करून टाकले आहे. हा मथितार्थ. इथे आपल्या पुन्नी व अनुकृती
भाग घेत्या झाल्या. पुन्नी बर्गर व अनु पिक्झा झाली व मध्ये फॉर्मलस मध्ये मॉडर्न डान्स करणारी मुले मुली. ह्याला पंकजने मॅडोनाचे म्युझीक हे गाणे घेतले आहे. पिझा बर्गर पुढे एका बाजूला एकेक. व मध्ये ही मुले. हे मिस्टर डीजे पुट रेकॉर्ड ऑन आय वाँट टू डान्स विथ माय बेबी. हे गाणे. ह्याची इतकी रिहरसल झाली की स्टेप्स मला अजूनही लक्षात आहेत. हे गाणे माझ्या प्ले लिस्ट मध्ये नेहमी असते व ते ऐकताना एक सुरेख नॉस्टॅ ल्जिक हिरवळ आजू बाजूला पसरते मनात.

मेरीडिअन, जे एच पी एस, भाविभ जिथे जिथे रिहर्सल शेड्युल असेल तिथे तिथे मी कार डायवर, घेउन जात असे. पुन्नीला भुक तहान लागेल म्हणून खाउ पाणी ज्युस घेउन जाई. ते टीचर्स पण काही प्लॅनिन्ग करत असत. मेरिडीअन चे क्यांटीण मस्त होते. छान कोझी शाळा.

एक दोनदा रवी पण ही रिहर्सल बघायला आला होता. एक दोनदा आत्या आलेली. रवीचे पंकजशी बोलणे झाले तेव्हा पंकज म्हणाला की मुलांना मॉडर्न डान्स मध्ये देखील एकही व्हल्गर
स्टेप दिलेली नाही. सो स्वीट ऑफ हिम.

रंगीत तालीम्चा दिवस आला. सर्व फिट झाले पण शेव्टी मुलांनी एक बॅनर वेलकम टु प्रिन्सिपल्स
असा उघडायचा होता. रहमानच्या वंदेमातरम गाण्यानंतर तो उलगडला पण उलटा!!!! सर्वांचे चेहरे पडले. पण तो भाग परत केला.

आता पर्फॉरमन्सच....... मुले उत्साहाने नुसती मुसमुसलेली होती ड्रेसची मापे, मेकप हेअर ऑर्नामेंट सर्वावर गहन चर्चा होत होत्या.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle